Corona: भारतातील कोरोना परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी; देशातील दुसऱ्या लाटेवर WHO कडून चिंता व्यक्त
Coronavirus in India : भारतातील परिस्थिती अत्यंत नाजूक झाली असून देश आता मोठ्या संकटातून जात असल्याचं मत WHO ने व्यक्त केलं.
![Corona: भारतातील कोरोना परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी; देशातील दुसऱ्या लाटेवर WHO कडून चिंता व्यक्त WHO chief Tedros Ghebreyesus says Covid 19 situation in India beyond heartbreaking Corona: भारतातील कोरोना परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी; देशातील दुसऱ्या लाटेवर WHO कडून चिंता व्यक्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/13/9d7fa53088e3e5d3c7233b193e12402f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus in India: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रोजच्या कोरोनाबाधितांची संख्या आता साडेतीन लाखांच्या वर जात आहे. मृत्यूच्या प्रमाणातही जागतिक तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली भारतातील परिस्थिती ही अत्यंत वाईट असून हृदय पिळवटून टाकणारी असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केलं.
जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत आहेत पण भारतातील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केलं.
#BREAKING Covid-19 situation in India 'beyond heartbreaking': WHO chief pic.twitter.com/b6PzyDqMGF
— AFP News Agency (@AFP) April 26, 2021
जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताला मदत
टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितलं की, भारतातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत पुरवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासोबतच पीपीई किट्स आणि इतर साहित्यांची मदत भारताता देण्यात येत आहे. भारतातील कोरोनाच्या संकटाला नियंत्रित आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे दोन हजारहून जास्त कर्मचारी भारतात काम करत असल्याचं तसेच भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमात मदत करत असल्याचं टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितलं. तसेच जगभरातील इतरही अनेक देशांनी भारताला मदत द्यायला सुरुवात केली आहे.
देशात कोरोना विषाणूचा आकडा अगदी झपाट्यानं वाढू लागला आहे. नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. रविवारी भारतात एकूण 3 लाख 52 हजार 991 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा ठरत आहे. एकिकडे रुग्णसंख्या वाढ असतानाच दुसरीकडे 2 हजार 812 कोरोनाबाधितांचा मृत्यूही झाला.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus | देशातील बिघडत्या कोरोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, केंद्र सरकारकडे मागितलं होतं उत्तर
- CoronaVirus | आता घरातदेखील मास्क वापरण्याची वेळ आलीय!, निती आयोगाच्या डॉ. वीके पॉल यांचा सल्ला
- कोरोना संकटात Google आणि Microsoft भारतासोबत; सुंदर पिचाई, सत्या नडेला यांच्याकडून मदतीचा हात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)