एक्स्प्लोर
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाबाबत लेख, वृत्तपत्राच्या संपादकाविरोधात गुन्हा दाखल
लोकसभा निवडणूक निकालानंतर 25 मे रोजी निखील गौडा यांच्याशी संबंधित लेख दैनिक 'विश्ववाणी'मध्ये छापण्यात आला आहे. या लेखाविरोधात जेडीएसकडून पोलीसांत तक्रार करण्यात आली आहे.
बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मुलाबाबत लेख छापल्यामुळे 'दैनिक विश्ववाणी'चे संपादक विश्वेश्वर भट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील दैनिक विश्ववाणीमध्ये निखील गौडा यांच्या पराभवानंतर छापण्यात आलेल्या लेखामुळे वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी जेडीएसचे सचिव प्रदिप कुमार यांनी पोलीसांत केलेल्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातल्या मंड्या मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुमालथा यांनी निखिल देवेगौडांचा पराभव केला आहे. मंड्या हा मतदारसंघ देवेगौडा कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघासाठी निखील यांनी हट्ट धरला होता. त्यामुळे एचडी देवेगौडा यांनी स्वतः तुमकूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि निखील यांना मंड्या येथून उमेदवारी दिली होती. मात्र या दोघांनाही आपापल्या मतदारसंघात पराभव पत्कारावा लागला आहे. या निकालानंतर 25 मे रोजी निखील गौडा यांच्याशी संबंधित लेख 'विश्ववाणी'मध्ये छापण्यात आला आहे.
प्रदिप कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनूसार, निखील यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या आपल्या पराभवाबद्दल आजोबा एचडी देवेगौडा यांच्याशी भांडण केल्याचा, आपले राजकीय करियर संपविल्याबद्दल आजोबांना दोष दिल्याचा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे. या लेखामध्ये अवास्तव गोष्टी छापण्यात आल्या असून त्या खोट्या असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या लेखामुळे निखील यांच्यासह देवेगौडा कुटुंबाची बदनामी होत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement