एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अर्थ मंत्रालयाकडून जवळपास साडे 11 लाख पॅन कार्ड रद्द
एकच व्यक्ती किंवा संस्थेकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आढळून आल्याने एकूण 11 लाख 44 हजार 211 पॅन कार्ड रद्द करण्यात आले. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवणं कायदेशीर गुन्हा आहे. दरम्यान या आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्यांच्या संख्येतही 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने तब्बल 11 लाख 44 हजार पॅन कार्ड म्हणजेच पर्मनंट अकाऊंट नंबर रद्द केले आहेत. पॅन कार्ड हे प्रत्येकाचं आर्थिक ओळखपत्र आहे. बँकेसह अनेक आर्थिक व्यवहार पॅन कार्डशिवाय होत नाहीत. मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर दोन पॅन कार्ड असल्याचं आढळून आल्यानंतर अर्थ मंत्रालयाने पॅन कार्ड रद्द केले आहेत.
अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 27 जुलै 2017 पर्यंत एकच व्यक्ती किंवा संस्थेकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आढळून आल्याने एकूण 11 लाख 44 हजार 211 पॅन कार्ड रद्द करण्यात आले. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवणं कायदेशीर गुन्हा आहे. मात्र कर वाचवण्यासाठी अनेक जण एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवतात. त्यामुळेच सरकारने आता पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आधार कार्डशी पॅन कार्ड जोडल्यानंतर एक व्यक्ती कोणत्याही प्रकारे दुसरं आधार कार्ड तयार करु शकत नाही. आधार नोंदणी करताना बोटाचे ठसे आणि आयरिस स्कॅन (बुबळांचा तपशील) करतात, जो प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो.
देशात 31 जुलै 2017 पर्यंत 32.68 कोटींपेक्षा जास्त पॅन कार्ड जारी करण्यात आले आहेत. तर 116 कोटी आधार कार्ड जारी करण्यात आलेले आहेत. म्हणजेच देशातील 90 टक्के लोकांकडे आधार कार्ड आहे.
अर्थ मंत्रालयाला 1566 असे पॅन कार्ड आढळून आले आहेत, ज्यांनी चुकीची ओळख सांगून पॅन कार्ड तयार केलं होतं. एनएसडीएल किंवा यूटीआय इंफ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेसकडून पॅनसाठी अर्ज करणाऱ्यांच्या माहितीची पडताळणी केली जाते. त्यानंतर आयकर विभागाकडून पॅन कार्ड जारी केलं जातं. एका व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आढळल्यास आयकर अधिकारीच ते रद्द करु शकतात.
आयकर भरणाऱ्यांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली
नोटाबंदीनंतर आयकर भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची माहितीही आयकर विभागाने दिली आहे. या आर्थिक वर्षात (2017-18) आयकर रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 5 ऑगस्टपर्यंत म्हणजेच शनिवारपर्यंत 2.83 कोटी जणांनी आयकर रिटर्न भरला आहे. तर गेल्या वर्षी हा आकडा 2.27 कोटी हा एवढा होता. म्हणजेच आयटी रिटर्न भरणाऱ्यांची संख्या 56 लाखांनी वाढली आहे.
नोटाबंदीचा परिणाम करावरील कमाईवरही पाहायला मिळाला. वैयक्तीक करातून कमाई 42 टक्क्यांनी वाढली आहे.
संबंधित बातमी : जवळपास साडे 11 लाख पॅन कार्ड रद्द, तुमचं स्टेटस काय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement