एक्स्प्लोर

‘जीएसटी आणि नोटाबंदीवर टीका करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावं’

भारताच्या अर्थव्यवस्थेची क्षमता ओळखायला मूडीजला थोडा उशीरच झाला असल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी व्यक्त केलं. तसंच जीएसटी आणि नोटबंदीवर टीका करणाऱ्या विरोधकांनी आता आत्मपरिक्षण करावं, असा टोलाही जेटलींनी लगावला.

नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेची क्षमता ओळखायला मूडीजला थोडा उशीरच झाला असल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी व्यक्त केलं. तसंच जीएसटी आणि नोटबंदीवर टीका करणाऱ्या विरोधकांनी आता आत्मपरिक्षण करावं, असा टोलाही जेटलींनी लगावला. मूडीजबद्दल बोलताना अरुण जेटली म्हणाले की, "आम्ही 13 वर्षांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील मूडीजच्या अपग्रेडचं स्वागत करतो. असे अपग्रेड अर्थव्यवस्थेतील सकारात्मक बदलांसाठी उचलण्यात आलेल्या पावलांसाठी दिले जातात. गेल्या काही वर्षात अर्थव्यवस्थेला मजबूत, स्थिर आणि दृढ करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांसाठीच हे रेटिंग असल्याचं आम्ही मानतो." अर्थमंत्री पुढे  म्हणाले की, "अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जे निर्णय घेण्यात आले, त्यात डिजिटायझेशन, आधार, जीएसटी, बँक रीकॅपिटलायझेशन आदींचा समावेश होता. या सर्वांमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. या रँकिंगमुळे सरकारच्या निर्णयांना आंतराष्ट्रीय मान्यता मिळाली," असंही त्यांनी सांगितलं. नोटाबंदी आणि जीएसटीवर टीका करणाऱ्यांना उद्देशून अरुण जेटली म्हणाले की, "भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या प्रक्रियेवर काही लोकांना संशय वाटतो. पण त्यांनी आता तरी यावरुन आत्मपरिक्षण करावं. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळाल्याने, आमच्या उद्देशांना नवं बळ मिळालं आहे." 13 वर्षांनंतर रेटिंगमध्ये सुधारणा आर्थिक आणि संस्थात्मक सुधारणांमुळे वृद्धीची शक्यता वाढल्याने रेटिंगमध्ये सुधारणा झाल्याचं मूडीजने सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे मूडीजने भारताचं रेटिंग 13 वर्षांनी अपग्रेड केलं आहे. याआधी 2004 मध्ये भारताचं रेटिंग वाढवून ‘Baa3’ केलं होतं. तर 2015 मध्ये रेंटिंग स्थिरवरुन (स्टेबल) सकारात्मक (पॉझिटिव्ह) श्रेणीत ठेवलं होतं. BAA3 चा अर्थ काय? BAA3 रेटिंगचा अर्थ म्हणजे सर्वात कमी गुंतवणुकीची स्थिती असणं. म्हणजेच आता मूडीजनुसार भारतात गुंतवणुकीचं वातावरण सुधारलं आहे. यामुळे रेटिंग BAA3 ने वाढवून  BAA2 केलं आहे. ‘मूडीज’च्या रँकिंगनंतर शेअर बाजारात मोठी उसळी मूडीजने काय म्हटलं? एखाद्या देशाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, त्यावर मूडीजचं रेटिंग ठरतं. मोदी सरकारने मागील काही काळात अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, असं मूडीजने म्हटलं आहे. विकासदर वाढणार मोदी सरकारने केलेल्या सुधारणांचा परिणाम काही काळाने दिसेल. उदाहरणार्थ, जीएसटी आणि नोटबंदीमुळे काही काळ विकासदरात घसरण झाली होती, असं मूडीजने म्हटलं आहे. पण मार्च 2018 पर्यंत भारताचा विकासदर 6.7 टक्के होईल. तर 2019 पर्यंत विकासदर पुन्हा एकदा 7.5 टक्क्यांवर पोहोचेल, असं अंदाज मूडीजने वर्तवला आहे. मूडीजचं नेमकं काम काय ? मूडीज इन्वेस्टर सर्विसेस ही संस्था मूडीज् म्हणूनच ओळखळी जाते. ही संस्था जगातील विविध अर्थव्यवस्थांवर आणि त्यात होणाऱ्या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवते. त्यानुसार प्रत्येक अर्थव्यवस्थेचं मानांकन करते. मूडीजने दिलेलं मानांकन अतिशय प्रतिष्ठेचं आणि विश्वासार्ह मानलं जातं. संबंधित बातम्या मूडीजच्या मते भारतात 'अच्छे दिन', 13 वर्षांनी रेटिंगमध्ये वाढ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Embed widget