एक्स्प्लोर

Fatima Sheikh Birth Anniversary : फातिमा शेख यांची आज जयंती; गुगलकडून अनोखा सलाम 

Fatima Sheikh Birth Anniversary :दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील मुलं आणि स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. त्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा, ही फातिमा शेख यांची ठाम भूमिका होती.

Fatima Sheikh Birth Anniversary : भारतातील वंचित घटकांना शिक्षण मिळावं यासाठी मोलाचं काम केलेल्या फातिमा शेख (Fatima Sheikh) यांची आज जयंती. फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं (Google) त्यांना अनोखा सलाम केला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त एक डूडल साकारलं आहे. यात त्यांच्या फोटोसह पुस्तकाचं कव्हर दिसून येत आहे. 

त्या काळात दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील मुलं आणि स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. त्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा, ही फातिमा शेख यांची ठाम भूमिका होती. त्यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्यासह अस्पृश्य आणि मुस्लिम समाजातील स्त्रिया व मुलांना शिकविण्याचे काम केले.

फातिमा शेख या उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या. ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी 1848 साली दलित मुले आणि स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली. मात्र, हे कृत्य धर्मविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. त्यातूनच त्यांच्या कुटुंबियांनी आणि गावातील इतर लोकांनीही या दाम्पत्यावर बहिष्कार टाकला. त्यांना घराबाहेरही काढले. 

अशावेळी उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी त्यांना राहण्यासाठी आणि शाळा चालविण्यासाठी राहते घर दिले. या दाम्पत्याच्या कल्पनेने प्रेरीत होऊन उस्मान शेख यांनीही फातिमा शेख यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची प्रेरणाही दिली. त्यानंतर सावित्रीबाईंच्या बरोबरीने शेख यांनीही शिक्षिका होण्यासाठी खूप कष्ट सोसले. बाह्मण्यवादी जातीव्यवस्थेविरोधात महात्मा फुले यांनी लढा पुकारला होता. मात्र, त्यांच्यासोबत शेख यांनादेखील सामाजिक रोषाचा, छळाचा सामना करावा लागला. 

फातिमा शेख मुलींना शिकविण्याचे काम करीत असत. घरोघरी जाऊन मुलींच्या कुटुंबाशी बोलून मुलींना शाळेत पाठवायला सांगत. शाळेचे कामकाजही त्याच बघत असत. त्यामुळेच फुले यांचे कार्य पूर्णत्वास नेण्यात शेख यांचे मोलाचे योगदान आहे. शिक्षणाचे कार्य अखंड चालू राहण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सावित्रीबाईंचा त्या मोठ्या आधार होत्या.  सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिराव फुले यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये फातिमा यांच्याविषयी प्रेमाच्या आणि प्रशंसेच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Commercial LPG Cylinder: युद्ध आखातात महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
युद्ध आखातात महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
Iran Israel America War: Microsoft पासून Apple, Google, Meta, HP पर्यंत...; इराण कुठेकुठे हल्ला करणार, यादीच जाहीर केली, डोनाल्ड ट्रम्पसह जगाची झोप उडाली!
Microsoft पासून Apple, Google, Meta, HP पर्यंत...; इराण कुठेकुठे हल्ला करणार, यादीच जाहीर केली, डोनाल्ड ट्रम्पसह जगाची झोप उडाली!
Live Blog Updates: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहिती होती; सुनील तटकरेंचं मोठं विधान
Live Blog Updates: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहिती होती; सुनील तटकरेंचं मोठं विधान
New Rule From 1 April 2026: रेल्वे, आयकर कायदा, पॅन, आधार, परदेश प्रवास...नवीन आर्थिक वर्षे, नवे नियम; आजपासून काय काय बदलणार?, A टू Z माहिती
रेल्वे, आयकर कायदा, पॅन, आधार, परदेश प्रवास...नवीन आर्थिक वर्षे, नवे नियम; आजपासून काय काय बदलणार?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Prajakta Mali Change Jewellery Brand Name: प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, 'प्राजक्तराज' ज्वेलरी ब्रँडच नाव अचानक बदललं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण
प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, 'प्राजक्तराज' ज्वेलरी ब्रँडच नाव अचानक बदललं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
Embed widget