एक्स्प्लोर
Advertisement
आता पंजाबसह कर्नाटकात शेतकरी आंदोलनाचं लोण
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशनंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीचं वादळ आता देशातील इतर कृषीप्रधान राज्यांमध्येही धडकलं आहे. पंजाब आणि कर्नाटकमधील शेतकरी आज कर्जमाफीच्या मागणीसाठी निदर्शनं करणार आहेत. कर्जमाफीच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याचीही माहिती मिळते आहे.
महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी तत्वत: मान्य करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशातही कर्जमाफीच्या घोषणेत स्पष्टता नाही. म्हणजे कर्जमाफीसाठी पैसे कुठून आणणार? इत्यादी प्रश्न आहेतच. त्याचदरम्यान, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी भाजप सरकारवर दबाव आणत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची लवकरात लवकर सोय करावी, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप करत सरकारविरोधात आक्रमक रुप धारण केलं. त्यानंतर सुकाणू समितीच्या माध्यमातून सरकार दरबारी मागण्या ठेवल्या. शेतकरी संपाचं रुप पाहता सरकारही हादरलं आणि मागण्यांवर गांभिर्याने विचार करत कर्जमाफी तत्त्वत: मान्य केली.
आता पंजाब आणि कर्नाटकमधील शेतकरीही कर्जमाफीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार असल्याने केंद्रातील मोदी सरकारसमोर आव्हान उभं राहणार आहे. शेतकऱ्यांच्या संतापाला मोदी सरकारला तोंड द्यावं लागणार आहे. एक-एक करुन देशातील सर्वच कृषीप्रधान राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक होताना दिसत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement