एक्स्प्लोर

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण; आंदोलक केएमपी एक्स्प्रेस वे जाम करणार

सिंघू सीमेवरुन शेतकरी कुंडली येथे जाऊन एक्स्प्रेस वे अडवणार आहेत. या मार्गावरील टोल प्लाझा देखील शेतकरी अडवणार आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्त आज दिल्ली आणि दिल्लीच्या सीमांना जोडणाऱ्या केएमपी एक्स्प्रेस मार्गावर 5 तासांची नाकाबंदी केली जाणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत शेतकरी केएमपी एक्स्प्रेस वे जाम करतील. त्याचबरोबर शेतकरी टोल देखील भरण्यास मनाई करतील. मात्र शेतकऱ्यांच्या मते ते पूर्ण शांततेत आंदोलन करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाने आवाहन केलं आहे की 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आंदोलकांनी काळी पट्टी बांधून निषेध नोंदवावा.

सिंघू सीमेवरुन शेतकरी कुंडली येथे जाऊन एक्स्प्रेस वे अडवणार आहेत. या मार्गावरील टोल प्लाझा देखील शेतकरी अडवणार आहेत. गाझीपूर सीमेवरुन शेतकरी डासना टोलकडे जातील. टिकरी सीमेजवळील बहादूरगडची सीमा देखील शेतकरी आंदोलक जाम करणार आहेत. तसेच शहाजहानपूर सीमेवर बसलेले शेतकरी आंदोलक गुरुग्राम-मानेसरहून जाणारा केएमपी एक्स्प्रेस वे जाम करणार आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने असंही सांगण्यात आलं आहे की ज्या सीमांवर टोल नाके जवळ असतील त्या देखील ब्लॉक केल्या जातील.

Farmer Protest : ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण, जाणून घ्या आंदोलनातील महत्वाचे टप्पे

शेतकरी सर्व टोल नाके जाम करतील

गाझीपूर सीमेवर बसलेल्या भारतीय किसान युनियनचे उत्तर प्रदेश अध्यक्ष राजवीरसिंह जादौन यांनी सांगितले की, शेतकरी येथून डासना टोलपर्यंत प्रवास करतील. परंतु हरियाणा-यूपीमधील सर्व टोल दुहाई, कासना, नोएडा इत्यादी ठिकाणी शेतकरी आंदोलक उपस्थित असतील आणि ते रस्ता जाम करतील. हे आंदोलन शांततेत पार पडणार असून प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. आंदोलनकर्ते प्रवाशांना शेती विषयक होणाऱ्या त्रासाबद्दल माहितीही देतील.

Farmer Protest : आता महिला शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणार, योगेंद्र यादवांची माहिती

आपत्कालीन वाहने थांबवले जाणार नाहीत

राजवीर सिंह पुढे म्हणाले की, आपत्कालीन वाहने थांबवण्यात येणार नाहीत. रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा कोणत्याही परदेशी पर्यटकांना रोखले जाणार नाही. तसेच सैन्याची वाहनेही थांबवली जाणार नाहीत. संयुक्त किसान मोर्चानेही सर्वसामान्यांना विनंती केली आहे की या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी घरे आणि कार्यालये येथे काळे झेंडे लावावेत.

महत्त्वाच्या बातम्या

'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Crime News: मोबाईल हप्त्यावरून तरुणाचं अपहरण, 5 दिवस डांबून जबरदस्तीने काम करायला लावलं; ब्लड बँकेत नेऊन रक्तही काढलं अन्..., आरोपींकडून क्रूरतेचा कळस
मोबाईल हप्त्यावरून तरुणाचं अपहरण, 5 दिवस डांबून जबरदस्तीने काम करायला लावलं; ब्लड बँकेत नेऊन रक्तही काढलं अन्..., आरोपींकडून क्रूरतेचा कळस

व्हिडीओ

Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report
Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी
UPI MDR :  पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा यूपीआयवरील शुल्काला विरोध, निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवलं, थेट इशारा दिला...
UPI वरील शुल्क आकारणीला पेट्रोलपंप चालकांचा विरोध, अर्थमंत्र्यांना पत्र पाठवत इशारा दिला...
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Embed widget