एक्स्प्लोर
Advertisement
रेल्वे नव्हे, बसपेक्षाही विमान तिकीट स्वस्त, स्पाईसजेटची भन्नाट ऑफर
मुंबई : स्पाईसजेट विमान कंपनीने 11 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना अशक्यप्राय वाटेल अशी ऑफर दिली आहे. कारण केवळ रेल्वेच नव्हे तर खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटापेक्षाही कमी किमतीत विमान प्रवासाची ऑफर देण्यात आली आहे.
केवळ 511 रुपयात देशांतर्गत विमान प्रवास ही ऑफर स्पाईसजेटने दिली आहे. तर परदेशी प्रवास टॅक्स वगळून केवळ 2,111 रुपयात करता येणार आहे. तीन दिवसांसाठी ही ऑफर आहे.
आजपासून म्हणजे 17 मे ते 19 मे 2016 पर्यंत तिकीट बुक करता येणार आहे. 19 मे रोजी मध्यरात्रीपर्यंत बुकिंग सुरु असेल.
हे बुकिंग केल्यानंतर तुम्ही 15 जून 2016 ते 30 सप्टेंबर 2016 या कालावधी दरम्यान देशांतर्गत प्रवास करु शकाल. तर देशाबाहेर प्रवासासाठी 1 जून 2016 ते 20 जुलै 2016 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
स्पाईसजेटच्या थेट विमानसेवा असलेल्या मार्गांसाठीच ही ऑफर लागू असेल. तसंच एकेरी प्रवासासाठीच या सुविधेचा लाभ घेता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement