लदाख सीमेवर भर थंडीतही जवानांना दिलासा, वांगचूक यांचा अनोखा प्रयोग, 'या' खोल्या पाहून चकीत व्हाल
देशाच्या आणि देशवासियांच्या संरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता सीमेवर झटणाऱ्या जवानांचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रसिद्ध अभियंता सोनम वांगचूक यांनी भन्नाट युक्ती केली आहे.
लदाख : प्रसिद्ध चित्रपट थ्री इडियट्स ज्यांच्यावर आधारीत आहे, असे अभियंता सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) हे त्यांचा आणखी एक अनोखा प्रयोग समोर घेऊन आले आहेत. वांगचूक यांनी चीन सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसाठी एक खास सोय करत विशिष्ट प्रकारच्या खोल्या तयार केल्या आहेत. ज्यामुळे कडाक्याच्या थंडीत जवानांना संरक्षण मिळणार आहे.
BACK FROM THE BORDER
Happy & proud... after dedicating the Solar Heated Insulated Ladakhi (SHILA) shelters to our brave jawaans on the Zero border with China at Chushul and Anlay.
Outside temp was already -20 C but inside +15.
Congratulations @FireFuryCorps @adgpi @PMOIndia https://t.co/qXc8lJN6tW
">
भारत आणि चीन यांच्यातील नाते आधीपासून चांगले नसल्याने सतत खटके उडत असतात. त्यामुळे लदाखसारख्या सीमावर्ती भागात भारतीय जवानांना बाराही महिने कडाक्याच्या थंडीत देशाच्या रक्षणासाठी उभे राहावे लागते. याजागी जवळपास उणे 20 सेल्सियस (-20 c) तापमान असल्याने सैनिकांची अवस्था खराब होते. त्यामुळेच वांगचूक यांनी एक विशेष प्रकारच्या खोल्या तयार केल्या आहेत. ज्यामुळे बाहेर उणे 20 इतके कमी तापमान असले तरी आतमध्ये जवळपास 15 सेल्सियस (15 c) इतके तापमान असणार आहे.
कोण आहेत सोनम वांगचुक?
आमिर खानच्या गाजलेल्या ‘थ्री इडियटस’ चित्रपटातील फुंगसुक वांगडु हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारीत आहे. लडाखसारख्या दूर्गम भागात वांगचुक यांनी शिक्षण, विज्ञानासारख्या क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आहेत. त्यासाठी सोनम वांगचूक यांचा मॅनसेसे पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. पाणी टंचाईवर मात करणारे आइस स्टुपा (ice stupa) साठीही ते प्रसिद्ध आहेत. वांगचुक यांनी 1988 साली इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला.
हे ही वाचा
- Omicron covid new variant : नव्या व्हेरिएंटचा धोका किती, उपाय काय? A टू Z माहिती
- NFH Survay : नवऱ्यांनी केलेली मारहाण योग्य आहे का?, भारतीय महिलांची चकीत करणारी उत्तरं!
- बांधावरचे वाद मिटेनात, संपत्तीचे कसे मिटणार, मुकेश अंबानींनी संपत्ती वाटपाची भन्नाट ट्रिक शोधली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha