एक्स्प्लोर

फेसबुक प्रोफाईल आधारशी जोडण्याविरोधात फेसबुकची सुप्रीम कोर्टात याचिका

फेसबुक प्रोफाईलला आधारशी लिंक करण्याबाबतच्या सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका फेसबुककडून दाखल करण्यात आली होती.

नवी दिल्ली : फेसबुक प्रोफाईलला आधारशी लिंक करण्याबाबतच्या सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका फेसबुककडून दाखल करण्यात आली होती. फेसबुकने याचिकेत म्हटले आहे की, हे प्रकरण प्रत्येक युजरच्या प्रायव्हसीशी निगडीत आहे. त्यामुळे देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये फेसबुक अकाऊंट आधारशी जोडण्याबाबत सुरु असलेली सर्व प्रकरणं सुप्रीम कोर्टाने स्वतःकडे घ्यावीत आणि त्यावर सुनावणी करावी. याप्रकरणी सध्या मद्रास, बॉम्बे आणि मध्य प्रदेश हायकोर्टांमध्ये एकूण चार याचिका प्रलंबित आहेत. फेसबुकतर्फे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात बाजू मांडली. रोहतगी म्हणाले की, "याप्रकरणी वेगवेगळ्या उच्च न्यायालयांमध्ये सुरु असलेल्या याचिकांवर वेगवेगळे फैसले सुनावले जाऊ शकतात. त्यामुळे मोठी द्विधास्थिती निर्माण होऊ शकते. केवळ एखाद्या राज्यात फेसबुक आधारशी लिंक करणे आणि इतर राज्यांमध्ये न करणे शक्य नाही. तसेच स्वतः सुप्रीम कोर्टाने याआधीच स्पष्ट केले आहे की, आधारचा वापर केवळ आवश्यक सरकारी सेवांसाठी करायला हवा" तमिळनाडू सरकारतर्फे अॅटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल आज सुप्रीम कोर्टात हजर होते. वेणुगोपाल म्हणाले की, "सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लोकांची खरी ओळख मिळवणे कठीण असते. अनेकदा गुन्हेगार याचा गैरफायदा घेतात. काही महिन्यांपूर्वी 'ब्लू व्हेल' नावाच्या एका खेळाचे फेसबुकवर प्रमोशन करण्यात आले. या गेममुळे देशभरात अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या. परंतु हा गेम भारतात कोणी लॉन्च केला? याबाबत आपल्याला कोणतीही माहिती मिळाली नाही" फेसबुकचे वकील रोहतगी म्हणाले की, "फेसबुकला आधारशी लिंक करणे लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ केल्यासारखे आहे. आमची कंपनी जगभरात काम करते. सर्व देशांमध्ये आमची एकप्रकारचीच प्रायव्हसी पॉलिसी आहे. तसेच व्हॉट्सअॅप तर अधिकच सुरक्षित आहे. व्हॉट्सअॅपचे मेसेज एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतात. स्वतः व्हॉट्सअॅपचे अधिकारीदेखील हे मेसेज वाचू शकत नाहीत. त्यामुळे फेसबुकला आधारशी लिंक करणे गरजेचे नाही. तसे केल्यास आमच्या जगभरातील व्यापारावर मोठा परिणाम होईल" याच्या उत्तरात वेणुगोपाल म्हणाले की, "कंपनी दावा करतेय की, व्हॉट्सअॅप मेसेज एन्क्रिप्टेड असतात. परंतु आयआयटीमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एखादा मेसेज कुठून सुरु झाला आहे. हे शोधता येऊ शकते. अशा प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर आपण व्हॉट्सअॅप प्रोफाईलशी लिंक करायला हवे. याद्वारे सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या गुन्हेगारांना पकडणे सोपे होईल"

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget