Mahua Moitra : पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचे प्रकरण: महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ होणार? खासदारकी रद्द करण्याची शिफारस
Mahua Moitra : लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याच्या आरोपावर समितीने महुआला या गंभीर गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हटले आहे.
नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या एथिक्स कमिटीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली असल्याचे वृत्त आहे. 'पैसे घेऊन प्रश्न' विचारण्याच्या आरोपाबाबतच्या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्याची शिफारस समितीने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दर्शन हिरानंदानी यांच्या रोख व्यवहार प्रकरणाच्या चौकशीची शिफारस भारत सरकारला करण्यात आली आहे.
लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याच्या आरोपावर समितीने महुआला या गंभीर गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हटले आहे.
महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी खासदारांसाठी असलेला लॉगिन आयडी आणि लोकसभेच्या वेबसाइटचा पासवर्ड व्यापारी दर्शन हिरानंदानीसोबत शेअर केला होता. जेणेकरून तो त्यांच्या वतीने प्रश्न विचारू शकेल.
बसपा खासदार दानिश अली यांच्या वर्तनाचा एथिक्स कमिटीने निषेध केला आहे. महुआ मोईत्रा यांनी 2 नोव्हेंबरला एथिक्स कमिटीवर आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. यानंतर दानिश अलीने प्रश्नांचा विपर्यास केला, जनभावना भडकावल्या आणि समितीचे अध्यक्ष आणि अध्यक्षांचा अपमान केला, असे कमिटीने म्हटले आहे.
महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप काय?
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे की, मोइत्रा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे देहद्राईने अदानी समूह आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्यातील लाच व्यवहाराचे पुरावे सादर केले आहेत.
महुआ मोइत्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अलीकडच्या काही दिवसांपर्यंत महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत विचारलेल्या 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न अदानी समूहावर केंद्रित होते.
दरम्यान, उद्योगपती हिरानंदानी यांनी शपथपत्रात कबूल केले आहे की, पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोईत्रा यांनी गौतम अदानी यांना लक्ष्य केले. हिरानंदानी यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी तृणमूलच्या खासदाराला पैसे दिल्याचा आरोप आहे.
यानंतर या प्रकरणाची एथिक्स कमिटीत सुनावणी झाली, मात्र तेथेही गदारोळ झाला. महुआसोबत समितीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी समितीने वैयक्तिक प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. महुआला विचारण्यात आले की ती रात्री कोणाशी बोलते? नंतर महुआने असेही सांगितले की एथिक्स कमिटी तिला घाणेरडे प्रश्न विचारत होती आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला.