एक्स्प्लोर

Sharad Yadav Profile: विद्यार्थी दशेपासून राजकारणाची सुरुवात अन् केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल, शरद यादवांचा जबरदस्त राजकीय प्रवास

विद्यार्थी दशेपासून राजकारणापासून सुरुवात केलेल्या शरद यादव यांनी राजकारणात खूप उंची प्राप्त केली. दांडगा जनसंपर्क आणि लोकांशी जुळलेली नाळ या गोष्टींनी त्यांना नेहमी लोकांमध्ये मानाचं स्थान मिळालं.  

Sharad Yadav Profile: बिहारसह देशाच्या राजकारणात एक मोठा चेहरा म्हणून आपल्या कारकीर्दीचा ठळक ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते शरद यादव (Sharad Yadav) यांचे निधन झाले. वयाच्या 75  व्या वर्षी त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. शरद यादव यांच्या निधनावर देशभरातील सर्वच नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. बडे बडे नेते शरद यादवांच्या राजकीय प्रवासाचं वर्णन करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. विद्यार्थी दशेपासून राजकारणापासून सुरुवात केलेल्या शरद यादव यांनी राजकारणात खूप उंची प्राप्त केली. दांडगा जनसंपर्क आणि लोकांशी जुळलेली नाळ या गोष्टींनी त्यांना नेहमी लोकांमध्ये मानाचं स्थान मिळालं.  

आज शरद यादव यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मुलीनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. पापा नहीं रहे, असं ट्वीट शरद यादव यांच्या मुलीनं केलं आहे. गुरुग्राम येथील फोर्टिंस रुग्णालयात शरद यादव यांनी अखेरचा श्वास घेतला.  

विद्यार्थी चळवळीतून राजकारणाची केली सुरुवात

शरद यादव यांचा जन्म 1 जुलै 1947 रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे झाला. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला, त्यानंतर त्यांनी सुरुवातीचे शिक्षण तिथेच केले. यादव यांना तरुणपणातच राजकारणाची आवड निर्माण झाली, त्यांनी जबलपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले. यावेळी ते विद्यार्थी राजकारणातही सक्रिय झाले होते आणि अभ्यासातही अव्वल आले होते.

पहिल्यांदा जबलपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार

शरद यादव यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर 1974 मध्ये ते पहिल्यांदा जबलपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. यादरम्यान ते जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशीही जोडले गेले. यानंतर शरद यादव यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. 1977 मध्ये ते जबलपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. यादरम्यान ते युवा जनता दलाचे अध्यक्षही झाले.

यानंतर 1986 मध्ये शरद यादव पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले. पुढे 1989 मध्ये यूपीच्या बदायूं लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर त्याच वर्षी त्यांना केंद्रीय मंत्रीपदही मिळाले. 13 ऑक्टोबर 1999 मध्ये ते केंद्रीय मंत्री होते. त्यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालयाचा कारभार होता. 2001 मध्ये केंद्रीय श्रम मंत्री म्हणून काम पाहिले.

शरद यादव हे 1991 ते 2014 पर्यंत शरद यादव बिहारमधील मधेपुरा मतदारसंघातून खासदार म्हणून सातत्यानं निवडून आले. यादव यांची 1997 मध्ये जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही निवड झाली होती.

ही बातमी देखील वाचा

Sharad Yadav Passed Away: जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget