एक्स्प्लोर
माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी, तरुणीवर बंदूक रोखली
धक्कादायक म्हणजे आशिष पांडे हा लेडिज टॉयलेटमध्ये जात होता, त्यावेळी या तरुणीने त्याला रोखल्याने, आशिष पांडेने थेट तिच्यावर बंदूक ताणली.
नवी दिल्ली: बहुजन समाज पार्टीचे (बसपा) माजी खासदार राकेश पांडेच्या मुलाची गुंडगिरी दिल्लीत पाहायला मिळाली. आशिष पांडेने एका फाईव्ह स्टार हॉटेलबाहेर तरुणीवर बंदूक ताणल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे आशिष पांडे हा लेडिज टॉयलेटमध्ये जात होता, त्यावेळी या तरुणीने त्याला रोखल्याने, आशिष पांडेने थेट तिच्यावर बंदूक ताणली.
देशाच्या राजधानीत तेही फाईव्ह स्टार हॉटेलबाहेर हे दृश्य पाहायला मिळालं. हा प्रताप करणाऱ्याचं नाव आहे आशिष पांडे. बसपाचे माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा. तो काल एका महिलेसोबत दिल्लीतल्या फाईव्ह स्टार हॉटेलात आला. तिथून निघताना पार्किंगवरुन एका महिलेशी त्याचा वाद झाला. मग पांडेजी थेट गाडीत गेले, आणि घोडा घेऊन आले. महिलेला गोळी मारण्याची धमकी देत त्यांनी शिवीगाळही केली. नशीब म्हणून हॉटेल स्टाफनं आशिष पांडेला वेळीच रोखलं.
खरंतर हॉटेल प्रशासनानं या गंभीर घटनेची माहिती पोलिसांना द्यायला हवी होती. पण तसं झालं नाही. आशिष पांडेच्या कर्तबगारीचा व्हिडीओ व्हायरल झाला. तो माध्यमांच्या हाती लागला आणि त्याच्या बातम्या झाल्या. मग पोलिसांना याची माहिती मिळाली.
पोलिसांनी व्हिडीओची सत्यता तपासली. आणि आशिष पांडेविरोधात स्यू मोटो गुन्हा दाखल केला आहे. आशिष पांडेला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांची एक टीम लखनौला रवानाही झालीय.
एखाद्या महिलेवर बंदूक ताणण्याइतकी मर्दुमकी आशिष पांडेत कुठून आली? हासुद्धा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर त्याच्या राजकीय वारशात आहे.
आशिष पांडेचे वडील राकेश पांडे आंबेडकरनगरमधून बसपाचे खासदार होते.
सध्या जलालपूरमधून आशिषचा भाऊ रितेश आमदार आहे.
आशिष पांडेचा सख्खा काकाही माजी आमदार आहे.
आशिष पांडे मात्र स्वत:ची कन्स्ट्रक्शन कंपनी चालवतो.
आशिषचा परिवार आंबेडकरनगरला राहतो, तर आशिष गोमतीनगरमध्ये
या तगड्या राजकीय पार्श्वभूमीमुळेच आशिष पांडेनं मुजोरी दाखवलीय.
परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावरील आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगल्यानं बेटी बचाव, बेटी पढावचा फुगा फुटलाय. आणि आता राजकीय गुंड थेट फाईव्ह स्टारमध्येच बंदुका नाचवू लागलेत. कायदा सुव्यवस्था नावाचा शब्द केवळ भाषणा-घोषणांपुरताच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement