एक्स्प्लोर

PF account holders : पीएफ खातेधारकांना मिळणार दिवाळी भेट, व्याजाचे पैसे लवकरच खात्यात

PF account holders : पीएफ खातेधारकांच्या खात्यात लवकरच व्याजाची रक्कम हस्तांतरित केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

PF Account Holders : कर्मचारी भविष्य निधी संघटनेची (ईपीएफओ) 6 कोटीहून अधिक खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावेळी त्यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होऊ शकते. कारण पीएफ खातेधारकांच्या खात्यात लवकरच व्याजाची रक्कम हस्तांतरित केली जाणार असल्याची माहिती आहे. ईपीएफओ लवकरच 2020-21 साठी 6 कोटीहून अधिक ग्राहकांच्या खात्यात व्याज हस्तांतरित करण्याची घोषणा करू शकते असं खात्रीलायक सूत्रांकडून समजलं आहे.
 
तुमच्या खात्यात किती व्याज जमा झालं आहे, केवळ एका क्लिकवर खात्याविषयी माहिती कशी मिळवाल हे जाणून घेण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा
 
केंद्र सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी ग्राहकांच्या खात्यावर पीएफवरील 8.5 टक्के व्याज हस्तांतरित करण्यासाठी आधीच ग्रीन सिग्नल दिला आहे. कामगार मंत्रालयाने देखील या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे.यामुळे EPFO लवकरच ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज रक्कम जमा करेल अशी सूत्रांची माहिती आहे.

EPFO ने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याजदर गेल्या 7 वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी व्याज समान होतं. 2019 मध्ये 8.65 टक्के व्याज ईपीएफवर मिळत होतं त्याचप्रमाणे पूर्वी 2018 मध्ये 8.55 टक्के व्याज देण्यात आलं होतं.

यानुसार मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये, केवायसी मध्ये अडथळा आल्यामुळे, अनेक लोकांना व्याज मिळवण्यासाठी 8-10 महिन्यांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती.

बनावट कॉल्सपासून सावध रहा

ईपीएफओने आपल्या खातेधारकांना बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क राहण्याची सूचना केली आहे.  'ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही किंवा ईपीएफओ त्याच्या खातेधारकाला कोणताही फोन कॉल करत नाही.' अशा आशयाचं ट्विट देखील ईपीएफओकडून करण्यात आलं आहे.

PF खाते

तुम्ही ज्या संस्थेत काम करता त्या संस्थेच्या वतीने दरमहा EPFO खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. ही एक निश्चित रक्कम असते, जी तुमच्या पगारातून कापली जाते आणि पीएफ खात्यात जमा केली जाते. तुमची संस्था देखील या खात्यात समान रक्कम योगदान देते.

व्याजाची माहिती कशी मिळवाल
 
तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे की नाही हे तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. तथापि, ईपीएफओ प्रत्येक ग्राहकाला मेसेजिंगद्वारे व्याज हस्तांतरित करण्याची माहिती देते.

तुम्ही स्वतः संदेश पाठवून खात्यातील शिल्लक माहिती देखील मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर EPFOHO UAN ENG टाइप करून 7738299899 वर पाठवावे लागेल. संदेशाची शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. जर तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. लक्षात ठेवा की तुम्ही त्याच मोबाईल फोनवरून संदेश पाठवला त्याचा क्रमांक यूएएन मध्ये नोंदणीकृत आहे.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 ला मिस्ड कॉल द्या. यानंतर तुम्हाला EPFO कडून एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या PF खात्याचा तपशील मिळेल.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget