Assembly Elections In 2023: पुढचं वर्ष निवडणुकांचं, लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल, 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका
Assembly Elections In 2023: गुजरात (Gujarat Election) आणि हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh Election) निवडणुका संपल्यानंतर आता पुढील वर्षी 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लोकसभेची सेमी फायनल समजली जात आहे.
Assembly Elections In 2023: गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुढील वर्षी देशभरात 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार (Assembly Elections in year 2023) आहेत. या निवडणुका लोकसभा निवडणुकीसाठीची (Loksabha Election 2024) सेमी फायनल असणार आहे. गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळवलेल्या भाजपचे आता या 9 राज्यांकडे लक्ष असणार आहे. तर, दुसरीकडे काँग्रेससाठीदेखील ही निवडणूक भविष्यातील वाटचालीसाठी गेमचेंजर ठरू शकते.
कोणत्या राज्यात होणार निवडणुका?
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशात सध्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आहे. 230 जागा असलेल्या मध्य प्रदेशातील विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर 2023 मध्ये संपुष्टात येणार आहे. वर्ष 2018 मध्ये झालेली विधानसभेची (Madhya Pradesh Election 2023) निवडणूक चुरशीची झाली. काँग्रेसला (Congress) 114 जागांवर तर भाजपला (BJP) 109 जागांवर विजय मिळवता आला होता. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस सरकार कोसळले होते.
राजस्थान
राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. राजस्थान विधानसभेच्या 200 जागा असून डिसेंबर 2023 मध्ये कार्यकाळ (Rajasthan Election 2023) संपणार आहे. यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेस (Congress) विरुद्ध भाजप (BJP) असा सरळ सामना होणार असल्याचे चित्र आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात अंतर्गत नाराजी आहे. मात्र, काँग्रेसमधील गटबाजी समोर दिसून आली आहे. काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यासमोर सत्ता कायम राखण्याचे आव्हान असणार आहे.
छत्तीसगड
सध्या काँग्रेसची सत्ता असणारे छत्तीसगड हे दुसरे राज्य आहे. भूपेश बघेल (Bhupesh Baghel) हे मुख्यमंत्री असून त्यांच्यासमोर पक्षातंर्गत नाराजी दूर करून सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान असणार आहे. छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर 2023 मध्ये संपुष्टात येणार (Chhattisgarh Assembly Election) आहे. नेहमी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर करून विरोधकांना आव्हान देणारी भाजप छत्तीसगडमध्ये कोणचा चेहरा समोर करणार, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या नावाने ही निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे.
कर्नाटक
दक्षिण भारतातील सर्वात मोठे राज्य आणि भाजपसाठी दक्षिणेतील सत्तेचा दरवाजा उघडणाऱ्या राज्यात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ मे 2023 मध्ये (Karanataka Assembly Election) संपुष्टात येणार आहे. सध्या भाजपची सत्ता (BJP) असून काँग्रेसने (Congress) आव्हान निर्माण केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर, दुसऱ्या स्थानावर असलेल्या काँग्रेसने तिसऱ्या स्थानी असलेल्या जनता दल सेक्युलर (JDS) या पक्षाला मुख्यमंत्रीपद देत सत्ता स्थापन केली होती. मात्र, भाजपने 'ऑपरेशन लोट्स' (Operation Lotus) अंतर्गत काही सत्ताधारी आमदार फोडले आणि सत्ता काबीज केली.
तेलंगणा आणि ईशान्य भारतात निवडणुका
तेलंगणामध्ये (Telangana Assembly Election) ही पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वीच विधानसभेची निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासमोर भाजप आणि काँग्रेसचे आव्हान असणार आहे. राव यांना सत्ता कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
ईशान्य भारतातही निवडणूका पार पडणार आहेत. कधीकाळी ईशान्य भारतात नाममात्र असणाऱ्या भाजपने ईशान्य भारतातही सत्ता काबीज केली आहे. त्रिपुरा (Tripura), मेघालय (Meghalay), नागालँड (Nagaland) आणि मिझोरम (Mizoram) या राज्यांमध्ये पुढील वर्षी निवडणुका आहेत.