एक्स्प्लोर

लवकरच 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार, येत्या 2 दिवसात तारखा जाहीर होण्याची शक्यता

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. येत्या 1 ते 2 दिवसात या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे

Assembly Election 2022 :  पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने नुकताच 4 राज्यांचा दौरा केला होता. तसेच मणिपूर राज्याचा देखील व्हर्च्युल माध्यमातून आढावा घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने केंद्र सरकारसोबत कोरोना स्थितीबाबत देखील चर्चा केली आहे. त्यामुळे लवकरच 5 राज्यांमध्ये निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्ष देखील कामाला लागल्याचे चित्र त्या राज्यांमध्ये दिसत आहे

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये मतदार याद्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे सर्वजण निवडणुकीच्या तारखांची वाट बघत आहेत. दरम्यान, पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, गुरूवारी निवडणूक आयोगाने या 5 राज्यांमधील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि अन्य आरोग्य क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने गृह सचिव अजय भल्ला यांच्याबरोबर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.  दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 2017 मध्ये विधनसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्याच्या तारखा या 4 डिसेंबर 2016 ला जाहीर केल्या होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या.  उत्तर प्रदेशमधील 17 व्या विधानसभेचा कालावधी हा 15 मे पर्यंत आहेत. मागच्या वर्षाचा विचार केला तर यावेळी उत्तर प्रदेसमध्ये 8 टप्प्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये 3 टप्प्यात तर उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाची तिसरी लाट धडकल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशातही कोरोनाची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 17 हजार 100 नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. भारतात मागील 24 तासांत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 3 लाख 71 हजार 63 झाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आढळले आहेत. केवळ या तीन राज्यांमध्ये 60 टक्के नवे कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. अशातच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये प्रचाराला होणाऱ्या गर्दीमधून कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

India Song In Pakistan : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय देशभक्तीचे बॉलिवूड गाणे, 'केसरी'मधील गाण्यावर शाळेत सैनिकाच्या वेशात डान्स
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय देशभक्तीचे बॉलिवूड गाणे, 'केसरी'मधील गाण्यावर शाळेत सैनिकाच्या वेशात डान्स
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget