एक्स्प्लोर

EVM सुरक्षित, कायदेशीर कारवाईचा विचार : निवडणूक आयोग

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप हॅकरने केला.

नवी दिल्ली : अमेरिकेत राहणाऱ्या एका सायबर हॅकरने ईव्हीएम हॅकिंगबाबत केलेल्या दाव्यानंतर भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. "या प्रकरणाचा वेगळा तपास केला जात असून कायदेशीर कारवाईचा विचार सुरु आहे," असं निवडणूक आयोगाने सांगितलं. हॅकरच्या आरोपांनतर भारताच्या निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करुन आपली बाजू मांडली आहे. "भारतीय निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं की, लंडनमधील एका कार्यक्रमात ईव्हीएम हॅक करण्याचा डेमो ठेवला होता. जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या या अपप्रचाराकडे ईसीआयचं गांभीर्याने लक्ष आहे. निवडणुकीदरम्यान वापरले जाणारे ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित आहेत," असं या पत्रकात म्हटलं आहे. प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटलं आहे की, "हे ईव्हीएम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने तयार केला आहे. यादरम्यान कडेकोट देखरेख आणि सुरक्षा असले. 2010 मध्ये स्थापन झालेल्या तांत्रिक तज्ज्ञांच्या समिती प्रत्येक टप्प्यात निश्चित मानकानुसार कठोर देखरेख करते." या प्रकरणात कायदेशीर कारवाई करता येऊ शकते का, याबाबतही विचार सुरु असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ईव्हीएम हॅकिंगमुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, हॅकरचा दावा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप हॅकरने केला. लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सय्यद शुजा या हॅकरने अत्यंत खळबळजनक आरोप केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) हॅक करण्याचं तंत्र आपल्याकडून आत्मसात केल्याचंही हॅकरने म्हटलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपचा ईव्हीएम हॅक करुन जिंकण्याचा प्रयत्न होता. परंतु आपण त्यांच्याकडून होणारे 'फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन' थांबवून आपच्या बाजूने निकाल वळवला असा दावा देखील या हॅकरने केला आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी गोपीनाथ मुंडेंनी आपल्याशी संपर्क साधला होता, असा दावा सय्यद शुजाने केला. गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅक केल्याची माहिती होती. मुंडे ही बाब जगजाहीर करण्याच्या भीतीनेच भाजपमधील काही नेत्यांनी त्यांची हत्या घडवून आणली, असा दावा सय्यद शुजाने यावेळी केला. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची 'रॉ'मार्फत चौकशी व्हावी : धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांचं राजधानी दिल्लीत कार अपघातामध्ये निधन झालं होतं. 3 जून 2014 रोजी दिल्ली विमानतळावर जाताना त्यांच्या गाडीला एका वेगवान कारने धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुंडेंना तातडीने 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं, मात्र कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget