एक्स्प्लोर
महाराष्ट्रात निवडणूक घेण्यास परवानगी, उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार
महाराष्ट्रातील राजकीय पेच जवळपास संपला आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली : राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आज झाली. या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान कोरोनाबाबतचे सगळे निर्बंध पाळण्याचं तसंच सुरक्षित निवडणूक घेण्याचं असं आयोगानं म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या विधानपरिषद निवडणुकीबाबत या बैठकीत जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने काल राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली होती. विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र दरम्यान आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जात भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजॉय मेहता, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभागृह सदस्यत्वाचा पेच सुटणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा राज्यपालांनंतर महाविकासघाडीतील तीन महत्वाचे घटक असलेले शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने देखील एक सहा पानांचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले होते. कोरोनाने निर्माण केलेली परिस्थिती मान्य आहे, पण काही काळजी घेवून निवडणूक घेणे शक्य करावे अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती.Election Commission of India (ECI) grants permission for holding elections to the Legislative Council (MLCs) in Maharashtra. The necessary guidelines will need to be ensured for safety against #COVID19 during the elections pic.twitter.com/teikSwVdyi
— ANI (@ANI) May 1, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement