एक्स्प्लोर

Election 2021 Dates, Full Schedule: बंगाल, केरळसह 5 राज्यात निवडणुका जाहीर; पश्चिम बंगालमध्ये तब्बल 8 टप्प्यात होणार मतदान

Assembly Election 2021 Date Full Schedule: निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत.

नवी दिल्ली : आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत.

निवडणुकांच्या तारखा..

  • केरळमध्ये एकाच टप्प्यात होणार विधानसभेची निवडणूक, 6 एप्रिल रोजी मतदान 2 मे रोजी निकाल
  • आसाममध्ये तीन टप्प्यात मदतदान होणार, 27 मार्च,
  • तामिळनाडूमध्ये पण एकाच टप्प्यात निवडणूक, केरळ प्रमाणेच मतदान सहा एप्रिलला तर 2 मे ला निकाल. केरळ आणि तामिळनाडू एकाच दिवशी होणार.
  • पश्चिम बंगलामध्ये आठ टप्प्यात निवडणूक होणार, 7 मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान
  • तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीच्या निवडणुका एकाच टप्प्यात सहा एप्रिल रोजी, तर आसामची निवडणूक तीन टप्प्यात होणार.
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक
  • पहिला टप्पा - 27 मार्च मतदान
  • दुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदान
  • तिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदान
  • चौथा टप्पा - 10 एप्रिल मतदान
  • पाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदान

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं 200 जागांचे लक्ष्य

पश्चिम बंगालमध्ये आधीपासून निवडणुकीचे वारे वाहत आहे. आज निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक प्रचारात उतरतील. सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी सरकार आहे. मात्र, यावेळी भाजपने 200 हून अधिक जागा आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी मोठ मोठे मेळावे घेण्यात येत आहेत. याखेरीज डाव्या आणि काँग्रेसच्या युतीमुळे बंगालचे राजकारण आणखी रंजक झाले आहे.

आसाममध्ये पुन्हा भाजप?

126 जागा असलेल्या आसाम राज्यात सध्या भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार आहे. येथे सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री आहेत. मागील निवडणुकीत भाजपने येथे 60 जागा जिंकल्या होत्या. यावेळी येथे काँग्रेसही विजयाचा दावा करीत आहे. परंतु, मागील निकाल पाहता काँग्रेस 122 जागा लढवून केवळ 26 जागा जिंकू शकली. येथे सरकार स्थापन करण्यासाठी 64 जागांची आवश्यकता आहे.

तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके सत्ता राखणार?

तामिळनाडूमध्ये सत्तेत येण्यासाठी जादुई आकडा 118 आहे. सद्यस्थितीत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम (AIADMK) येथे सरकार चालवत असून पलानीस्वामी हे राज्याचे प्रमुख आहेत. मागील निवडणुकीत एआयएडीएमकेने 136 जागा जिंकल्या, तर मुख्य विरोधी पक्ष द्रमुकने 89 जागा जिंकल्या. बहुमताचा आकडा 188 जागा आहे.

केरळमध्ये सीपीआयचं काय होणार?

केरळमध्ये सध्या सीपीआयच्या नेतृत्वाखालील डावे लोकशाही आघाडी (एलडीएफ) सरकार आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे सरकार चालवल आहेत. मागील निवडणुकीत एलडीएफला 91 आणि काँग्रेसच्या नेतृत्वात युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) 47 जागा मिळाल्या. येथे बहुमतासाठी 71 जागांची आवश्यकता आहे. निवडणुकीच्या तारखांपूर्वी राहुल गांधींनी येथे बऱ्याच जाहीर सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही येथे भेट दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget