एक्स्प्लोर

Pahalgam : 5 लाखांची मदत आणि घरही बांधून देणार, काश्मिरी आदिल शाहच्या कुटुंबासाठी एकनाथ शिंदेंची मदत, देशभरातून कौतुक!

Pahalgam Terror Attack : पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून पाच लाखांची मदत करण्यात आली आहे. 

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला (Pahalgam Terror Attack) होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह (Syed Adil Hussain Shah) या अवघ्या 20 वर्षांच्या स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली. 

पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सय्यदच्या कुटुंबीयांना धनादेश (Eknath Shinde Help For Syed Adil Hussain Shah Family) देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 

दहशतवाद्यांची रायफल हसकावून घेण्याचा प्रयत्न 

अवघ्या 20 वर्षाचा असलेला सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करायचा. त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर सय्यद याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. 

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी 23 एप्रिल रोजी रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.

आदिलच्या धाडसाचे शिंदेंकडून कौतुक

या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सय्यद  आदिलने दाखवलेली माणुसकी आणि धाडसाबाबतचा अनुभव उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याची दखल घेत शिंदे यांनी सय्यद  आदिलच्या कुटुबीयांना तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार सय्यद  आदिलच्या कुटुंबीयांची शिवसेना कार्यकर्ते आणि सरहदचे पदाधिकारी यांनी भेट घेत मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी स्थानिक आमदार सईद रफीक शाह उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. सय्यद आदिलच्या भावाने हल्ल्याच्या दिवशी झालेला घटनाक्रम सांगितला. त्याने पर्यटकांच्या बचावासाठी कशाप्रकारे दहशतवाद्यांशी मुकाबला केला. रायफल खेचली आणि दहशतवाद्यांनी त्याला कशा गोळ्या घातल्या याचा अनुभव त्याने सांगितला. 

घर नव्याने बांधून देण्यास मदत करणार

सय्यद आदिलने बहादुरी दाखवत माणुसकीचे अनोखे उदाहरण जगासमोर दाखवून दिले आहे, त्याचे हौतात्म्य वाया जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शाह कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच सय्यद आदिलच्या कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर नव्याने बांधून देण्यासाठी मदत करू, अशी ग्वाहीही शिंदे यांनी यावेळी दिली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
Jasprit Bumrah Angry : आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video
आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video
Ram Sutar Passes Away: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला
U19 Asia Cup 2025 Semifinal Schedule : सेमीफायनलचं चित्र स्पष्ट, 4 संघ निश्चित! भारत श्रीलंकेविरुद्ध सामना, पाकिस्तान कोणाशी भिडणार?, वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, कधी होणार सामना?, जाणून घ्या Schedule
सेमीफायनलचं चित्र स्पष्ट, 4 संघ निश्चित! भारत श्रीलंकेविरुद्ध सामना, पाकिस्तान कोणाशी भिडणार?, वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, कधी होणार सामना?, जाणून घ्या Schedule

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
Jasprit Bumrah Angry : आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video
आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video
Ram Sutar Passes Away: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला
U19 Asia Cup 2025 Semifinal Schedule : सेमीफायनलचं चित्र स्पष्ट, 4 संघ निश्चित! भारत श्रीलंकेविरुद्ध सामना, पाकिस्तान कोणाशी भिडणार?, वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, कधी होणार सामना?, जाणून घ्या Schedule
सेमीफायनलचं चित्र स्पष्ट, 4 संघ निश्चित! भारत श्रीलंकेविरुद्ध सामना, पाकिस्तान कोणाशी भिडणार?, वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, कधी होणार सामना?, जाणून घ्या Schedule
Ravindra Dhangekar: शिंदे गटाचा पुण्यातील प्रमुख चेहरा, तरीही रवींद्र धंगेकरांना बैठकीला बोलावलं नाही, मुरलीधर मोहोळांशी पंगा घेणं भोवलं
शिंदे गटाचा पुण्यातील प्रमुख चेहरा, तरीही रवींद्र धंगेकरांना बैठकीला बोलावलं नाही, मुरलीधर मोहोळांशी पंगा घेणं भोवलं
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी मंत्रिपदासाठी दिल्ली गाठली, अमित शाहांना भेटले, पण वाल्मिक कराडबाबतच्या निर्णयामुळे मंत्रिपदाचं स्वप्न अधुरं राहणार?
धनंजय मुंडेंनी मंत्रिपदासाठी दिल्ली गाठली, अमित शाहांना भेटले, पण वाल्मिक कराडबाबतच्या निर्णयामुळे मंत्रिपदाचं स्वप्न अधुरं राहणार?
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
Embed widget