Saputara Rain : सापुतारामध्ये पावसाचा हाहा:कार, पुराच्या पाण्यात आयशर डोळ्यादेखत गेला वाहून, दोन जण बालंबाल बचावले
Saputara Rain Update : गुजरात हद्दीत असलेल्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
Saputara News : राज्यात सध्या पावसाचा (Rain) जोर वाढल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. गुजरात हद्दीत असलेल्या सापुतारा (Saputara) परिसरात मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत असून उगाचिचपाड ते अंबापाडा या रस्त्यावर पुराच्या पाण्यात आयशर टेम्पो डोळ्यादेखत वाहून गेला आहे. यात पाण्यात अडकलेल्या दोन जणांना गावकऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढले आहे.
पुराच्या पाण्यात आयशर गेला वाहून
महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगत असलेल्या आणि गुजरात हद्दीत असलेल्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे डांग जिल्ह्यातील अंबिका नदीला पूर आल्याचे चित्र आहे. अंबिका नदीवर कॉजवेवर पाणी ओव्हरफ्लो झाले झाले आहे. उगाचिचपाड ते अंबापाडा या रस्त्यावरून जात असताना आयशर टेम्पो चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने आयशर पुराच्या पाण्यात वाहून गेला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. नदीत अडकलेल्या टेम्पोतून गावकऱ्यांनी दोन जणांना सुखरूप बाहेर काढले.
'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
आज राज्यात कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रायग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये पावसाची संततधार
नाशिक शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची (Rain) संततधार सुरु आहे. इगतपुरी (Igatpuri) आणि त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) होत असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात (Nashik Dam Position) वाढ होत असल्याचे चित्र आहे. इगतपुरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून दारणा धरणातून (Darna Dam) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नाशिककरांची तहान भागावणाऱ्या गंगापूर धरणाचा (Gangapur Dam) पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. इगतपुरी तालुक्यातील पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सकाळी 9 वाजेपासून दारणा धरणातून 9 हजार 334 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग दारणा नदीत सुरु करण्यात आला आहे.
आणखी वाचा