ED Raid : भारतात ED ची कडक कारवाई, चिनी मोबाईल कंपन्यांवर छापा, आणखी एक कंपनी रडारवर
ED Raid : ईडीकडून चिनी कंपनीच्या 40 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे
ED Raid : चिनी मोबाईल कंपनीतील फसवणुकी प्रकरणी (Chinese Mobile Company) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत छापे टाकले आहेत. या प्रकरणाबाबत ईडी भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि दक्षिण राज्यांमध्ये छापे टाकत आहे. दरम्यान, याचा तपास सीबीआयकडूनही केला जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, चीनची मोबाइल कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित काही इतर कंपन्यांवर भारतातील 44 ठिकाणी नुकतेच छापे टाकण्यात आले आहेत.
याप्रकरणी सीबीआयही तपास करत आहे
ईडीकडून चिनी मोबाईल कंपन्यांवर जवळपास 44 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या छापेमारी सुरू असून आवश्यक कागदपत्रे तपासली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी सीबीआयही तपास करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, चिनी कंपन्या आधीच भारतीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत.
चीनच्या टॉप मोबाईल कंपन्यांवर कारवाई
सुत्रांच्या माहितीनुसार, चीनची मोबाइल कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित काही इतर कंपन्यांवर भारतातील 44 ठिकाणी नुकतेच छापे टाकले जात आहेत. अलीकडेच केंद्र सरकारने चिनी कंपनीच्या मूळ भारतातील व्यवसायासाठी तपास तीव्र केला आहे. मे महिन्यात ZTE कॉर्प. आणि Vivo Mobile Communication Co. कथित आर्थिक अनियमितता प्रकरणी तर Xiomi Corp. आणखी एक चीनी कंपनी आहे. जी केंद्रीय एजन्सीच्या तपासाचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या
हो... महाराष्ट्रात ED च्या मदतीनंच सरकार आलं; पण कसं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Pande : मुंबई पोलीस माजी आयुक्त संजय पांडेंना ईडीची नोटीस, पाच जुलैला हजर राहण्याचे निर्देश