(Source: ECI/ABP News/ABP Majha)
North India Earthquake | मला वाटतंय भूकंप सुरु आहे; राहुल गांधींनी अनुभवला भूकंप
उत्तर भारतात शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के (North India Earthquake) जाणवले. त्यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi ) शिकागो विद्यापीठाचे प्रोफेसर आणि राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसोबत एका व्हर्च्युअल मीटिंगमध्ये व्यस्त होते. त्या संबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
नवी दिल्ली: शुक्रवारी रात्री उत्तर भारताने भूकंपाचे धक्के अनुभवले. हे भूकंपाचे धक्के जाणवत असताना राहुल गांधी शिकागो विद्यापीठातले प्रोफेसर दिपेश चक्रवर्ती यांच्या सोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करत होते. भूकंप झाल्यानंतर काही सेकंदासाठी ते थांबले आणि पुन्हा चर्चा सुरु केली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
शिकागो विद्यापीठातले प्रोफेसर दिपेश चक्रवर्ती आणि राज्यशास्त्राच्या काही विद्यार्थ्यांशी काँग्रेस नेते राहुल गांधी चर्चा करत होते. राहुल गांधींची ही चर्चा सुरु असताना अचानक झालेल्या भूकंपामुळे ते काही वेळ थांबतात. मला वाटतं भूकंप सुरु आहे असं राहुल गांधींनी बोलल्याचंही या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येतंय. त्यानंतर राहुल गांधी स्मितहास्य करतात आणि पुन्हा चर्चेला सुरुवात करतात.
#earthquake @RahulGandhi in between in a live interview when earthquake happened.#earthquake pic.twitter.com/GRp9sxHoMY
— Rohit Yadav (@RohitnVicky) February 12, 2021
North India Earthquake | जम्मू-काश्मीरपासून दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे तीव्र झटके
जम्मू-काश्मीरपासून दिल्लीपर्यंत काल रात्री भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. 7.5 रिश्टर स्केल तीव्रता असलेल्या या भूकंपाचं केंद्र ताजिकिस्तानमध्ये होतं. या भूकंपाचे झटके पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यातल्या लोकांनी अनुभवले आहेत.
उत्तर भारतातील या भूकंपाचे केंद्र पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी असल्याचं नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं. या भूकंपावेळी उत्तर भारतात भयाचं वातावरण निर्माण झालं होतं. लोकं आपल्या घरातून बाहेर पडून मोकळ्या मैदानावर काही वेळ थांबल्यांच चित्र सगळीकडे पहायला मिळालं होतं. या भूकंपावर अधिक संशोधन केल्यानंतर या भूकंपाचे केंद्र ताजिकिस्तानमध्ये असल्याचं लक्षात आलं. या भूकंपात अद्याप कोणतीही हाणी झाल्याची माहिती नाही.
नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजिकिस्तानमध्ये 7.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेनं 10 वाजून 31 मिनिटांनी भूकंप झाला.