(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तराखंडमधील चमोलीवर आणखी एका आपत्तीचं संकट
संशोधकांच्या माहितीनुसार ऋषीगंगा नदीपासून 6 किमी अंतरावर एक हिमनदीस्वरुप तलाव आढळून आला आहे.
देहरादून : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून एक आठवडा उलटत नाही, तोच या भागात आणखी एका संकटाची चाहूल लागली आहे. संशोधकांच्या माहितीनुसार ऋषीगंगा नदीपासून 6 किमी अंतरावर एक हिमनदीस्वरुप तलाव आढळून आला आहे.
नव्यानं आढळून आलेल्या या तलावाबाबतची माहिती मिळाल्यानंतर, त्याची माहिती मिळवणाऱ्या वाडिया इंस्टीटयूट ऑफ हिमालयन जियोलॉजीनं असंही स्पष्ट केलं आहे, की अजूनपर्यंत याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही यी या तलावाच्या नजीक असणाऱ्या लोकसंख्येला याचा कोणता धोका असल्याची बाब स्पष्ट होऊ शकलेली नाही.
4 वाघांच्या तावडीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी मचाणीवर जीव मुठीत घेऊन काढली रात्र
संस्थेच्या संचालकपदी असणारे कलाचंद साई म्हणाले, 'संस्थेच्या संशोधकांच्या एका चमूने रविवारी आलेल्या संकटानंतर दुसऱ्याच दिवशी अपघातग्रस्त भागाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या भागाचं निरीक्षण केलं होतं. तिथंच त्यांना एका हिमनदी स्वरुपातील तलाव असल्याची बाब आढळून आली'. त्यांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार हल्लीच झालेल्या हिमसख्लनामुळंही हा तलाव तयार झालेला असू शकतो. हेलिकॉप्टरपासून जवळपास 400 मीटर अंतरावरुन या तलावाची छायाचित्रंही काढण्यात आली. सध्याच्या घडीला या तलावातील जलस्तर आणि त्याच्या व्यासाचं परीक्षण करत आहेत.
पोलीस यंत्रणाही सक्रिय
उत्तराखंड पोलीस मुख्यालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार रैनी गावाच्या वरील भागात तपोवन येथे तयार झालेल्या या तलावापाशी एनडीआरएफचा एक चमू पोहोचला आहे. सध्याच्या घडीला तलावातील पाणी वाहतं आहे. हा चमी काही काळासाठी सदर भागातच राहणार आहे.