North India Earthquake | जम्मू-काश्मीरपासून दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे तीव्र झटके
North India Earthquake : जम्मू-काश्मीरपासून दिल्ली एनसीआरपर्यंत भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. भूकंपाचं केंद्र ताजिकिस्तान होतं आणि याची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरपासून दिल्ली एनसीआरपर्यंत भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. भूकंपाचं केंद्र ताजिकिस्तान होतं आणि याची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे झटके पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि चंदिगढ या राज्यातही जाणवले आहेत.
नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजिकिस्तानमध्ये 7.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेनं 10 वाजून 31 मिनिटांनी भूकंप आला. नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजीनुसार, अमृतसर (पंजाब) मध्ये रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे.
भूकंपशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, "उत्तर भारतामध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी होती आणि याचं केंद्र पंजाब येथील अमृतसर हे होतं.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करुन लोकंच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली आहे.
Earthquake tremors felt in Delhi. Praying for everyone's safety. https://t.co/8fU8TGQLiE
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 12, 2021
भूकंप होतात तरी कसे?
पृथ्वीच्या गाभ्याच्या आणि कवचाच्या मध्ये असलेले मेटल द्रवरुप असते. अर्धवट द्रवरुप असल्याने ते पृथ्वीच्या बाह्य कवचाला चिकटते. त्यामुळे पृथ्वीचे मॅग्नेटिक फील्ड बदलते. त्याचा थेट परिणाम पृथ्वीच्या परिवलनावर होतो आणि पृथ्वीची गती काही मिलिसेकंदांनी कमी होते. दिवसाच्या आकारातही बदल होतो. यामुळे चुंबकीय तरंग निर्माण होऊन भूकंप होतात.
भूकंप झाल्यास कोणती काळजी घ्यावी?
- तुम्ही एखाद्या इमारतीत असताना भूंकपाचे तीव्र धक्के जाणवू लागले तर तात्काळ एखाद्या मजबूत फर्निचरचा आसरा घेऊन त्याखाली जाऊन लपा. किंवा एखाद्या कोपऱ्यात उभे राहून तुमचा चेहरा आणि डोकं झाकण्याचा पुरेसा प्रयत्न करा.
- शक्य झाल्यास तात्काळ इमारतीतून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करा.
- तुम्ही एखाद्या वाहानात बसले असल्यास तत्काळ वाहन थांबवा आणि आतच बसून राहा
- जर तुम्ही ढिगाऱ्याखाली अडकले असाल तर चुकूनही काडेपेटी जाळू नका. तसंच अजिबात हलण्याचा प्रयत्न करु नका.
- ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर एखाद्या पाईप किंवा भिंतीवर हळूहळू हात मारा. जेणेकरुन बचाव पथक तुमच्यापर्यंत पोहचू शकेल.