Earthquake: अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 4.4 तीव्रता
Earthquake In Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील दिबांग खोऱ्यात रविवारी सायंकाळी उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे.

Earthquake In Arunachal Pradesh: तैवानमध्ये एकीकडे भूकंपाचे 100 हुन अधिक धक्के जाणवल्याची बातमी समोर आल्यानंतर आता अरुणाचल प्रदेशातील दिबांग खोऱ्यात रविवारी सायंकाळी उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. हे भूकंपाचे धक्के संध्याकाळी 6.27 च्या सुमारास जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती. भारतातील अनेक भागात नुकतेच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दोन दिवसांपूर्वी लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने शुक्रवारी सांगितले की, लेहमधील अल्चीच्या उत्तरेस 189 किमी अंतरावर 4.8 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरमधील कटरापासून 62 किमी पूर्व-ईशान्येस 3.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ही देशातील भूकंप क्रियाकलापांवर देखरेख ठेवणारी भारत सरकारची संस्था आहे.
तैवानमध्ये भूकंप
रविवारीच तैवानमध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 एवढी होती. तैवानच्या किनारपट्टीवर 7.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर जपानने सुनामीचा इशारा दिला आहे. तैवानमध्ये अनेक इमारती कोसळल्या. रस्ते, पुलांचे नुकसान झाले आणि ट्रेनचे डबे रुळावरून घसरले आहेत.
तैवानच्या हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू तैतुंग काउंटीमध्ये होता. राजधानी तैपेई आणि दक्षिण-पश्चिम भागातील शहर काओशुंगमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की, रविवारी दुपारी 2:44 वाजता तैतुंगच्या उत्तरेला सुमारे 50 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर खोलीवर भूकंपाचा धक्का बसला. एका अहवालानुसार, सुरुवातीला भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी नोंदवली गेली होती, परंतु नंतर ती 6.9 इतकी कमी झाली.
भूकंपामुळे तैवानमध्ये ट्रेन खेळण्यातील ट्रेनसारखी हालताना दिसली
तैवानमधील भूकंपाची तीव्रता इतकी प्रचंड आहे की येथे ट्रेन खेळण्यातील ट्रेनसारखी हालतानाही दिसत आहे. तैवानमधील या आपत्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
An earthquake of magnitude 7.2 hit off the coast of Taiwan#Taiwan #earthquake #台湾地震 #臺灣 #地震 #台湾 pic.twitter.com/XS0p2iES4z
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) September 18, 2022
इतर महत्वाच्या बातम्या:
तैवानमध्ये 24 तासांत 100 भूकंपाचे धक्के, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
