Delhi: दिल्लीमध्ये 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के... नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमध्ये
Delhi NCR Earthquake: दिल्लीमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसतात पण आताचे धक्के हे जाणवण्याइतपत तीव्र असल्याची माहिती आहे.
Earthquake in Delhi : दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले असून नागरिक घराबाहेर आले असल्याची माहिती आहे. भूकंपाचे हे धक्के 7.7 रिश्टर स्केल इतके होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दिल्लीमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसतात. पण आता बसलेले धक्के हे जाणवण्याइतपत तीव्र असल्याची माहिती आहे. या भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक आपापल्या घरातून बाहेर आले. राभी 10 वाजून 17 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला आहे. दिल्लीसह तुर्कमेनीस्तान, पाकिस्तान, कझाकिस्तान या देशांनाही या भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती आहे.
Earthquake tremors felt in Delhi. Details awaited. pic.twitter.com/Hs0A6BUEiU
— ANI (@ANI) March 21, 2023
या भूकंपाची खोली 156 किमी असल्याचं सांगण्यात येतंय. तसेच याचे केंद्र हिंदूकूश (Hindu Kush) पर्वतरांगेमध्ये आहे. त्यामुळेच याचा धक्का अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान या देशांना बसल्याची माहिती आहे. या भूकंपाची 71.09 अशांशावर नोंद करण्यात आला आहे.
Earthquake of Magnitude:6.6, Occurred on 21-03-2023, 22:17:27 IST, Lat: 36.09 & Long: 71.35, Depth: 156 Km ,Location: 133km SSE of Fayzabad, Afghanistan for more information Download the BhooKamp App https://t.co/kFfVI7E1ux @ndmaindia @Indiametdept @moesgoi @PMOIndia pic.twitter.com/sJAUumYDiM
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) March 21, 2023
Earthquake Hit Leh Ladakh : लडाखमध्ये 23 सेकंद भूकंपाचे धक्के
लडाखमध्ये रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले. लडाखमध्ये बसलेले हे भूकंपाचे धक्के हे 23 सेकंद इतक्या वेळेसाठी होते.
An earthquake with a magnitude of 6.6 on the Richter Scale hit 133km SSE of Fayzabad, Afghanistan today at 10:17 pm IST: National Centre for Seismology pic.twitter.com/7Wt71qf0rf
— ANI (@ANI) March 21, 2023
#WATCH | Uttar Pradesh: People rush out of their houses in Vasundhara, Ghaziabad as strong earthquake tremors felt in several parts of north India. pic.twitter.com/wg4MWB0QdX
— ANI (@ANI) March 21, 2023
ही बातमी वाचा :