एक्स्प्लोर

Earth Day 2022 : वसुंधरा दिनी भारतातील नॅशनल जिओग्राफिकचा 'वन फॉर चेंज' उपक्रम

Earth Day 2022 : वसुंधरा दिनी भारतातील नॅशनल जिओग्राफिकचा 'वन फॉर चेंज' उपक्रम. 22 एप्रिल, 2022 पासून डिस्ने स्टारवरील मनोरंजन वाहिन्यांवर पृथ्वीवरील खऱ्या चॅम्पिअन्सवरील लघुपट मालिका.

Earth Day 2022 : पृथ्वी... आपल्या जगण्यासाठीचा महत्त्वाचा घटक. कारण पृथ्वीमुळेच आपण जगतोय. आपण पृथ्वीची कशा प्रकारे काळजी घेतो, यावर आपलं अस्तित्व अवलंबून असतं. एका व्यक्तीनं केलेल्या एका छोट्या बदलांचा संपूर्ण ग्रहावर व्यापक परिणाम होऊ शकतो. प्रेक्षकांसाठी हा आशेचा किरण आणि प्रेरणा घेऊन येत नॅशनल जिओग्राफिकतर्फे (National Geographic) आपल्या परिणामकारक, विश्वासार्ह कथाकथनाच्या समृद्ध वारशासह वसुंधरा दिनी 'वन फॉर चेंज' हा उपक्रम सुरू करत असल्याची घोषणा करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून नॅशनल जिओग्राफिक लघुपटांची एक शृंखला प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आपल्या जगाला अधिक सुंदर करण्यासाठी असामान्य पावलं उचललेल्या बदलकर्त्यांच्या असामान्य गाथा या लघुपटांमध्ये दाखविण्यात येणार आहेत. नॅशनल जिओग्राफिकव्यतिरिक्त डिस्ने स्टारवरील मनोरंजन वाहिन्यासुद्धा हे लघुपट दाखवून या उपक्रमाला सहाय्य करणार आहेत आणि बदल घडविण्याच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्या लाखो प्रेक्षकांना प्रोत्साहन देणार आहे. 

हे लघुपट नॅशनल जिओग्राफिकचे टेलिव्हिजन प्लॅटफॉर्म आणि डिस्ने स्टारवरील मनोरंजन वाहिन्यांवर प्रसारित होणार आहेत. त्याचप्रमाणे नॅशनल जिओग्राफिक सोशल मीडिया हँडल्सवरही प्रदर्शित होणार आहेत. या हँडल्सचे भारतात एकत्रितपणे एक कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. प्रेक्षकांना एक पाऊल उचलण्यास प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टानं आणि 'बदल घडविणारी व्यक्ती स्वतः होण्यासाठी' प्रेरित करणाऱ्या या गाथा, तळमळीने वैयक्तिक पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींवर केंद्रीत आहेत. या लघुपटांमध्ये या असामान्य व्यक्तींच्या आयुष्याची ओळख करून देण्यात येणार आहे. त्यांच्या कामाचा परिचय करून देण्यात येईल आणि पृथ्वीच्या संवर्धनासाठी त्यांनी जी वाट चोखाळली आहे. त्या वाटेवर जाण्यासाठी ते कशामुळे प्रेरित झाले, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने खास कार्यक्रम म्हणून 'वन फॉर चेंज' उपक्रमात अशा 10 प्रेरणादायी बदलकर्त्यांचे काम अधोरेखित करण्यात येणार आहे ज्यांच्यापैकी प्रत्येकाने बदल घडविणारा मार्ग चोखाळला आहे.

Earth Day 2022 : वसुंधरा दिनी भारतातील नॅशनल जिओग्राफिकचा 'वन फॉर चेंज' उपक्रम

"आपल्या जगाबद्दलचे ज्ञान आणि समज अधिक पुढे न्यावी हा नॅशनल जिओग्राफिकचा गाभा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही आमच्या विचारांना चालना देणाऱ्या आणि वस्तुस्थितीवर आधारित माहितीपटांनी आमच्या प्रेक्षकांना या जगाची माहिती दिली आहे. आणि जगाची काळजी घेण्यास मदत केली आहे. 'वन फॉर चेंज'सह आम्हाला देशभरातील अशा अतुलनीय व्यक्तींच्या गोष्टींच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना प्रेरित करायचं होतं ज्यांनी आपल्या पृथ्वीसाठी एक पाऊल उचललं आहे, आणि त्यासाठी सतत काम करत राहिलेत.", असं डिस्ने स्टारचे नेटवर्क एंटरटेनमेंट चॅनल्सचे प्रमुख केव्हिन वाझ म्हणाले आहेत.

या उपक्रमाची माहिती आणि उद्देश याचा विचार करता डिस्ने स्टारच्या आमच्या सर्व मनोरंजन वाहिन्यांवर हे लघुपट दाखवू आणि आमच्या लाखो प्रेक्षकांपर्यंत हे लघुपट पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली चालना आम्ही देऊ. या उपक्रमाच्या माध्यमातून या तळमळीच्या, यशोगाथेच्या आणि आपल्या वसुंधरेच्या विशुद्ध प्रेमाच्या कथा आणि या कथांमधील व्यक्ती एक ठिणगी पेटवतील आणि पृथ्वीवर प्रेम असलेल्यांना या पृथ्वीचे एक शाश्वत आणि आशादायी भविष्य घडविण्यासाठी एक पाऊल उचलण्यासाठी प्रेरणा देतील.", असंही ते म्हणाले. 

"आपण सगळेच नॅशनल जिओग्राफिक पाहत मोठे झालो आहोत आणि या ब्रँडची एक गोष्ट मला अत्यंत आवडते. ती म्हणजे, आपल्या अत्यंत खिळवून ठेवणाऱ्या आणि रोमांचित करणाऱ्या कथांनी लोकांना प्रेरित करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. 'वन फॉर चेंज' हा एक खास उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हा ब्रँड, पृथ्वीच्या भल्यासाठी आपल्या स्वतःच्या निवडीतून महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या यशोगाथा सांगण्यासाठी आपला प्लॅटफॉर्म देत आहे. वातावरण संवर्धनाची गरज आहे, याची जाणीव असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी अशा इव्हेंटचा एक भाग होणं प्रोत्साहन देणारं होतं. त्यामुळे, जगात बदल घडविण्यासाठी प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या शाश्वतता चळवळीसाठी एक निश्चित वाटचाल तयार होईल, अशी आशा आहे.", असं बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा म्हणाली.

या सीरिजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या लघुपटांतील दहा जण कोण? 

  • वाणी मूर्ती : त्यांना 'वर्म क्वीन' म्हणतात. वाणी कम्पोस्टिंगचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी जागरुकता निर्माण करत आहेत.
  • पूर्णिमा बर्मन देवी : हर्गिला आर्मीच्या लीडर असलेल्या पूर्णिमा ग्रेटर अॅडजंक्ट स्टॉर्क या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्याच्या संरक्षणासाठी काम करत आहे. 
  • तेजस सिदनल : हे वास्तुरचनाकार असून कार्बन कचऱ्यापासून त्यांनी एक टाईल्स (लादी) तयार केली आहे.
  • व्यंकटेश चार्लू : हे सागरी संवर्धनकर्ते असून गोव्यात प्रवाळांच्या पुनःस्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत. 
  • विद्युत मोहन : 2020 'यूएनईपी यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ' असलेले विद्युत मोहन यांनी असं यंत्र तयार केले आहे, जे कृषी अवशेषांपासून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उत्पादनं तयार करतं.
  • वर्षा रायकर : या रेडियो बुंदेलखंडमध्ये आरजे असून त्या वातावरण बदलाबद्दल जागरुकता निर्माण करतात.
  • रुक्मणी कटारा : सौरऊर्जा कंपनीच्या सीईओ असून त्या ग्रामीण भारतात नवीकरणीय ऊर्जेत क्रांती घडवू पाहत आहेत.
  • पूनम आणि आदित्य सिंह : हे जोडपं रणथंबोर व्याघ्रप्रकल्पाच्या सीमेवरील भागात जंगल तयार करत आहे, जे मनुष्य आणि प्राणी यांच्या अधिवासांदरम्यान असलेली उभयरोधी जमीन (बफर) असेल.
  • तुलसी गौडा : पद्मश्री पुरस्कार विजेत्या तुलसी गौडा या त्यांच्या गावात गेली 50 वर्षे वनसंवर्धनाचे काम करत आहेत आणि त्यांनी जंगलाचा चालताबोलता ज्ञानकोश म्हणतात.
  • सोनम वांगचुक : हे इको-आर्किटेक्ट असून त्यांनी निसर्गातील घटकांचा वापर करून लडाखमध्ये कार्बन-न्यूट्रल रचना उभारल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore : भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
Jaykumar Gore nude photo: मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
Yavatmal Crime News : डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar Mumbai | राजीनामा देऊन विषय संपत नाही-धनंजय मुंडेंना सहआरोपी करा..- पवारVijay Wadettiwar On Congress | काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले..Vijay Wadettiwar : भाजपचा मंत्री महिलेच्या मागे लागलाय, विजय वडेट्टीवारांचा रोख कुणावर? ABP MAJHAJaykumar Gore Photo Controversy : जयकुमार गोरेंनी महिलेला पाठवले नग्न फोटो? प्रकरणाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore : भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
Jaykumar Gore nude photo: मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
Yavatmal Crime News : डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
Sanjay Raut Samna: फडणवीस-अजितदादा धनंजय मुंडेंना म्हणाले,
फडणवीस-अजितदादा धनंजय मुंडेंना म्हणाले, "हवा गरम आहे, मामला थंड होईपर्यंत आराम करा नंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ"; 'सामना'च्या अग्रलेखातील इनसाईड स्टोरी
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी गोव्यात थाटामाटात लग्न, दोन दिवसांपूर्वी टीव्ही रिमोटवरून वाद; महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरनं गळ्याला दोरी लावली
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी गोव्यात थाटामाटात लग्न, दोन दिवसांपूर्वी टीव्ही रिमोटवरून वाद; महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरनं गळ्याला दोरी लावली,
कांदे खाण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
कांदे खाण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची चीनसह भारतावर परस्पर कराची तलवार, अंमलबजावणीची तारीख सांगितली
भारत अन् चीनवर परस्पर कर लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, अंमलबजावणीची तारीख सांगितली
Embed widget