एक्स्प्लोर

e-Shram : जर ई-श्रम कार्ड असेल तर कामगारांना देशातल्या सर्व राज्यांत मिळणार हे लाभ, जाणून घ्या

आतापर्यंत केंद्राच्या आणि राज्यांच्या योजनांचा लाभ त्या-त्या राज्यांतील कामगारांना मिळत होता. आता ई-श्रमच्या माध्यमातून कोणत्याही राज्यामध्ये सुविधांचा लाभ घेता येणं शक्य आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुरु केलेल्या ई-श्रम पोर्टलला (E Shram Portal)असंघटित कामगारांचा चागलाच प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत देशभरातील साडे नऊ कोटी कामगारांनी यावर नोंदणी केली आहे. त्यामुळे या कामगारांना आता केवळ त्या-त्या राज्यांमध्ये सरकारी योजनेचा लाभ मिळणार नसून संपूर्ण देशभरात कोणत्याही राज्यामध्ये त्याचा लाभ मिळणार आहे. 

देशातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल सुरु केलं आहे. विशेषत: कोरोना काळात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. भविष्यात त्यांना अशा प्रकारे पुन्हा अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. 

बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते आणि घरगुती कामगार आणि इतर अनेक कामगार हे आपली नोंदणी करू शकतात. यामध्ये नोंदणी केल्यानंतर, कामगारांना 12 अंकी नंबरचे लेबर कार्ड (Labour Card) दिले जाईल .त्या कार्ड वर त्या व्यक्तीचे नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि कौटुंबिक माहिती असे डिटेल असेल. या कार्डमुळे कामगारांना भविष्यात सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.

ई-श्रम पोर्टलवर अशी नोंदणी करा

1. ई-श्रम पोर्टलमध्ये नोंदणी करण्यासाठी, सर्वप्रथम   https://eshram.gov.in या लिंकवर भेट द्या.
2. यानंतर  Register on e-shram वर क्लिक करा.
3. समोर आलेल्या self Resistration Block मध्ये तुमच्या आधार कार्डची नोंद करा.
3. त्यानंतर देण्यात आलेला अचूक कॅप्चा कोड भरा.  नंतर आपला मोबाईल नंबरची नोंद करुन त्यावर आलेला ओटीपी नंबर भरा, नंबर व्हेरिफाय करून घ्या.
4. पुढील पेजवर तुमची वैयक्तिक माहिती भरा.
5. सर्व माहिती भरून झाल्यानंतर Register बटणावर क्लिक करा.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी आपले ओळखपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबूक किंवा बॅंक डिटेल, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो असणं अनिवार्य आहे.

जर एखाद्या कामगाराचे आधार कार्ड मोबाईलला कनेक्ट नसेल तर जवळच्या कम्युनिटी सर्व्हिस सेंटरला भेट द्या आणि बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. यानंतरही जर काही समस्या आली तर 14433 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर कॉल करुन आपल्या समस्येचं निवारण करता येईल.

ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामगाराला 12 अंकी युनिक नंबर असलेले ई-श्रम कार्ड देण्यात येईल. त्याच्या मदतीने या कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
हवाई चप्पल घालणाऱ्याने हवाई सफर करावा हे माझं स्वप्न, नवी मुंबई विमानतळ लोकार्पणातून मोदींचं भाष्य, काँग्रेससह उद्धव ठाकरेंवरही निशाणा
हवाई चप्पल घालणाऱ्याने हवाई सफर करावा हे माझं स्वप्न, नवी मुंबई विमानतळ लोकार्पणातून मोदींचं भाष्य, काँग्रेससह उद्धव ठाकरेंवरही निशाणा
Eknath Shinde on PM Modi: मोदीजी हात लावतात तिथं सोनं होतं, मोदी है तो मुमकिन है; विमानतळ उद्घाटनात एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव, ठाकरेंवर हल्लाबोल
मोदीजी हात लावतात तिथं सोनं होतं, मोदी है तो मुमकिन है; विमानतळ उद्घाटनात एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव, ठाकरेंवर हल्लाबोल
Jhund actor died: मोठी बातमी : नागराज मंजुळेच्या सिनेमात काम केलेल्या तरुणाची हत्या, दारुसाठी मित्रानेच घात केला
मोठी बातमी : नागराज मंजुळेच्या सिनेमात काम केलेल्या तरुणाची हत्या, दारुसाठी मित्रानेच घात केला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 07 Oct 2025 : Maharashtra News Updates : Superfast News : 02 PM : ABP Majha
Nashik Blast | सातपूरमध्ये Cutter स्फोट, 7-8 नागरिक गंभीर जखमी, चिमुकल्याचाही समावेश
TOP 100 Headlines : 07 Oct 2025 : Maharashtra News Updates : Superfast News : ABP Majha
Banjara ST Reservation | धाराशिवमध्ये Banjara समाजाचा भव्य मोर्चा, पारंपरिक वेशभूषेत ST आरक्षणाची मागणी
Pratibha Dhanorkar : Parameshwar Meshram कुटुंबियांच्या आरोपांवर प्रतिभा धानोरकर यांच्याशी बातचीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
हवाई चप्पल घालणाऱ्याने हवाई सफर करावा हे माझं स्वप्न, नवी मुंबई विमानतळ लोकार्पणातून मोदींचं भाष्य, काँग्रेससह उद्धव ठाकरेंवरही निशाणा
हवाई चप्पल घालणाऱ्याने हवाई सफर करावा हे माझं स्वप्न, नवी मुंबई विमानतळ लोकार्पणातून मोदींचं भाष्य, काँग्रेससह उद्धव ठाकरेंवरही निशाणा
Eknath Shinde on PM Modi: मोदीजी हात लावतात तिथं सोनं होतं, मोदी है तो मुमकिन है; विमानतळ उद्घाटनात एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव, ठाकरेंवर हल्लाबोल
मोदीजी हात लावतात तिथं सोनं होतं, मोदी है तो मुमकिन है; विमानतळ उद्घाटनात एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव, ठाकरेंवर हल्लाबोल
Jhund actor died: मोठी बातमी : नागराज मंजुळेच्या सिनेमात काम केलेल्या तरुणाची हत्या, दारुसाठी मित्रानेच घात केला
मोठी बातमी : नागराज मंजुळेच्या सिनेमात काम केलेल्या तरुणाची हत्या, दारुसाठी मित्रानेच घात केला
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत जोकर, दलबदलूसारखा आरोप झालेले प्रशांत किशोर किंगमेकर ठरणार? राजकीय तज्ज्ञांचा नेमका अंदाज काय?
बिहार निवडणुकीत जोकर, दलबदलूसारखा आरोप झालेले प्रशांत किशोर किंगमेकर ठरणार? राजकीय तज्ज्ञांचा नेमका अंदाज काय?
Tata Sons board dispute: टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, चेअरमन एन. चंद्रशेखरन थेट अमित शाहांच्या निवास्थस्थानी भेटीला; तब्बल 45 मिनिटे बैठक, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, चेअरमन एन. चंद्रशेखरन थेट अमित शाहांच्या निवास्थस्थानी भेटीला; तब्बल 45 मिनिटे बैठक, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
निलेश घायवळला ओळखतो, पण तो मित्र नाही; धंगेकरांच्या आरोपानतंर समीर पाटील माध्यमांपुढे आले
निलेश घायवळला ओळखतो, पण तो मित्र नाही; धंगेकरांच्या आरोपानतंर समीर पाटील माध्यमांपुढे आले
गुडन्यूज! दिवाळीसाठी गावी जाणं सोप्प झालं, पुणे विभागातून 598 जादा गाड्या, पिंपरी चिंचवडमधून सर्वाधिक
गुडन्यूज! दिवाळीसाठी गावी जाणं सोप्प झालं, पुणे विभागातून 598 जादा गाड्या, पिंपरी चिंचवडमधून सर्वाधिक
Embed widget