एक्स्प्लोर

गोव्यात ड्रग्जची लागवड, कांदोळीत दोघांना अटक

गोव्यात ड्रग्स कोठून येतो याची चर्चा नेहमीच रंगत असते. शेकडो ड्रग्स पेडलर्स पकडले तरी गोव्यात सतत उपलब्ध होणारे ड्रग्स हे पोलिसांसाठी आव्हान ठरत आलेले आहे.

पणजी : पोलिसांनी ड्रग्ज व्यवहाराच्या विरोधातील फास कितीही आवळला तरी ड्रग्जचे व्यवहार काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. कळंगुट पोलिसांनी काल धडक कारवाई करुन कांदोळीसारख्या गजबजलेल्या पर्यटनस्थळाजवळ होत असलेल्या कॅनाबीसच्या बेकायदा लागवडीचा छडा लावून दोन तरुणांना अटक केली. कॅनाबीस या वनस्पतीचा वापर ड्रग्स तयार करण्यासाठी केला जातो. कांदोळी येथे त्याची चोरी छुपी लागवड केली जात होती. कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांना त्याची खबर मिळाली, तेव्हा त्यांनी धाड टाकून तेथे लागवड केलेली. 10 लाख रुपयांची कॅनाबीस जप्त करण्यात यश मिळवले. गोव्यात अशा प्रकारची कारवाई प्रथमच झाली आहे. गोव्यात ड्रग्ज कोठून येतो याची चर्चा नेहमीच रंगत असते. शेकडो ड्रग्ज पेडलर्स पकडले तरी गोव्यात सतत उपलब्ध होणारे ड्रग्ज हे पोलिसांसाठी आव्हान ठरत आलेले आहे. कांदोळी येथील कॅनाबीसच्या लागवडीचा प्रकार उघड झाल्यामुळे अशा प्रकारची शेती आणखी दुसरीकडे कुठे होत तर नाही ना याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. कांदोळी येथे केलेल्या कारवाईमध्ये कळंगुट पोलिसांनी सुसांता साहो आणि प्रवेश सालाम या तरुणांना अटक केली आहे. अराडी-कांदोळी येथे बेकायदेशीर पद्धतीने कॅनाबीसची लागवड होत असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली होती. खात्रीशीर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी पथक तयार करुन लागवड केली जात असलेल्या ठिकाणी धाड टाकली. लोकांच्या नजरेस पडू नये अशा पद्धतीने या कॅनाबीसची लागवड करण्यात आली होती. या ड्रग्जच्या शेतीची राखण करत असताना सुसांता साहू (26)आणि प्रवेश सालाम(20)या दोन युवकांना कळंगुट पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दोन राखणदारांना अटक केल्यानंतर कॅनाबीसची रोपे कापून ती जप्त केली. पोलिसांनी या ठिकाणहुन हुक्का देखील जप्त केले असून ज्या खोलीचा वापर केला जात होता ती खोलीसुद्धा सील केली आहे.ही धाड काल सायंकाळी 5.30 ते रात्री 8 च्या दरम्यान टाकण्यात आली. ड्रग्जच्या शेताच्या राखणदारांनी ही शेती कांदोळी येथील लॅनी फायल्हो यांची असून त्यांच्या जागेत हा प्रकार सुरु असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी जमीन मालका विरोधात देखील गुन्हा नोंदवला आहे. कळंगुट पोलिसांनी 10 किलो कॅनाबीस जप्त केले असून त्याची किंमत अंदाजे 10 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सीताराम मळीक करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
Embed widget