एक्स्प्लोर
साबरमती आश्रम भेट : ट्रम्प यांना बापूंचा विसर, तर ओबामांनी जिंकलं होतं भारतीयांचं मन
साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर ट्रम्प यांनी व्हिजिटर पुस्तकात आपले मत लिहिले. या अनोख्या भेटीबद्दल ट्रम्प यांनी माझे महान मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हिजीटर बुकमध्ये महात्मा गांधींचा उल्लेख केला नाही.
नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या अहिंसेचे तत्वज्ञान भारतानं जगाला दिलं. त्यामुळेच गांधीजींशी निगडीत वास्तूंचा समावेश परदेशी पाहुण्यांच्या दौ-यात हमखास असतोच. आजही अहमदाबाद एअरपोर्टवर आगमन झाल्याबरोबर ट्रम्प यांचा पहिला मुक्काम साबरमती आश्रमताचं होता. ज्या हृदयकुंज कुटीत बापू आणि कस्तुरबा यांचं सहजीवन व्यतित झालं, तो ट्रम्प यांनी पाहिला. शिवाय चरख्यावर सूतकताईचाही अनुभव घेतला. पण इतकं करुनही व्हिजिटर बुकमध्ये त्यांना भावलेले गांधी काही उतरले नाहीत.
साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर तिथल्या व्हिजिटर बुकमधे ट्रम्प यांनी लिहिलेला हा संदेश. संदेश जरा नीट वाचला तर येथे गांधी नावाचा शब्दही सापडणार नाही. त्याऐवजी परममित्र असं संबोधन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधीबद्दल लिहायला दोन शब्दही सुचू नयेत? सहसा कुठल्याही महापुरुषांच्या स्मारकात जे व्हिजिटर बुक असते त्यात तिथं आल्यानंतर तुमच्या मनातल्या त्या महापुरुषाच्या भावना अपेक्षित असतात. त्या स्मारकाच्या दर्शनानं त्या महापुरुषाच्या कुठल्या आठवणी तुमच्या मनात जाग्या होतात याचंच ते प्रतिंबिंब. पण साबरमती आश्रमातल्या फेरफटका मारल्यानंतरही ट्रम्प यांच्या मनात मात्र गांधी काही रुजले नाहीत. अहमदाबादमधील साबरमती आश्रम म्हणजे महात्मा गांधी यांच्या वास्तव्यानं पुनित झालेला परिसर आहे. आश्रमात कुणी परदेशी पाहुणा आला तरी बापूंच्या विचारांपुढे लीन होऊन, त्यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानापुढे थक्क होऊन जातो. याच्या आधीही अनेक महापुरुषांनी बापूंच्या आठवणींबद्दलचे शब्द अशा व्हिजिटर बुकमध्ये लिहिलेले आहेत. अगदीच उदाहरण द्यायचे असेल तर बराक ओबामांनी काय लिहिलं होतं.Gujarat: US President Donald Trump writes a message in the visitors' book at the Sabarmati Ashram, 'To my great friend Prime Minister Modi...Thank You, Wonderful Visit!' pic.twitter.com/mxpJbSMg4W
— ANI (@ANI) February 24, 2020
ओबामा यांनी लिहले होते, मार्टिन लूथर किंग यांनी जे सांगितले ते आजही सत्य आहे. गांधीजींचे विचार आजही भारतात जिवंत असून जगासाठी ही एक महान भेट आहे. आम्ही आशा करतो की, सर्व देशातील लोकांनी सत्य आणि प्रेमाची भावना आचरणात आणावेत. #NamasteyTrump | आरेवाडी कवठे महाकाळच्या धनगर बांधवांचं नृत्य! #नमस्तेट्रम्प संबंधित बातम्या : #NamasteyTrump : पाकिस्तानने दहशतवादाचे अड्डे नष्ट करावेत : डोनाल्ड ट्रम्प 'माय ग्रेट फ्रेण्ड मोदी', साबरमती आश्रमात ट्रम्प यांचा अभिप्राय; गांधीजींचा उल्लेखही नाहीAnd this is what @barackobama had to say about the Great Mahatma possibly at Rajghat or Sabarmati. The distinction can not be more stark. pic.twitter.com/5cwirQwj3R
— Manish Tewari (@ManishTewari) February 24, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement