Domino's Delivery : पिझ्झा प्रेमींनी 'हे' वाचा... 30 नाही, फक्त 20 मिनिटांत मिळणार डॉमिनोज पिझ्झा
Domino's Pizza Delivery : आता फक्त 20 मिनिटांमध्ये डॉमिनोज डिलिव्हरी करणार आहे. त्यामुळे तुमचा आवडता पिझ्झा तुम्हाला आणखी लवकर मिळणार आहे.
Domino's Pizza Delivery in 20 Minutes : डॉमिनोज ( Domino's ) आता 20 फक्त 20 मिनिटांमध्ये पिझ्झा डिलिव्हरी ( Pizza Delivery ) करणार आहे. त्यामुळे तुमचा आवडता पिझ्झा ( Pizza ) तुम्हाला आणखी लवकर मिळणार आहे. भारतात डॉमिनोज चालवणाऱ्या जुबिलेट फूडवर्क्सने ही घोषणा केली आहे. अमेरिकन कंपनी डॉमिनोज (Domino's) भारतातील ग्राहकांना अवघ्या 20 मिनिटांत पिझ्झा उपलब्ध करून देणार आहे. कंपनीने माहिती देत सांगितलं आहे की, डिलिव्हरी बॉईजच्या ( Delivery Boy ) सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
20 मिनिटांत पिझ्झा डिलिव्हरी
भारतात डॉमिनोजचं कंत्राट चालवणाऱ्या जुबिलेट फूडवर्क्स कंपनीने (Jubilant FoodWorks) 14 शहरांमध्ये 20 मिनिटांत डिलिव्हरी सेवा सुरू केली. करण्याची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या डॉमिनोज कंपनीकडून भारतात 30 मिनिटांमध्ये पिझ्झा डिलिव्हरी केली जाते.
अमेरिकेनंतर भारतात डॉमिनोजचा सर्वात मोठा ग्राहक वर्ग
डॉमिनोजचा अमेरिकेनंतर भारतात सर्वात मोठा ग्राहक वर्ग आहे. डोमिनोज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रसेल वेनर यांच्या मते, भारतामध्ये 20 मिनिटांत डिलिव्हरी सेवा देऊन कंपनी ग्राहकांना अधिक उत्तम आणि जलद सेवा देण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. अलीकडच्या काळात डॉमिनोजच्या भारतातील व्यवयासात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना लक्ष्य करून कंपनी आगामी काळात भारतातील व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे.
'या' गोष्टींवर डॉमिनोज कंपनी भर
डोमिनोज कंपनीने भारतात 20 शहरांमध्ये 20 मिनिटांमध्ये पिझ्झाची डिलिव्हरी सुरू केली आहे. डोमिनोज हा प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड आहे. डोमिनोज ग्राहकांना पिझ्झा खाण्याचा उत्तम अनुभव देण्यासाठी नेहमीच तप्तर असल्याचं पाहायला मिळते. यासाठी कंपनीकडून उत्पादन, नावीन्य, चव, किंमत आणि कस्टमर सर्व्हिस यासारख्या अनेक पैलूंवर सतत लक्ष केंद्रित केले जाते.