एक्स्प्लोर
टोल होता 40 रुपयांचा, कर्मचाऱ्याने स्वाईप केले 4 लाख!
बंगळुरु: तुम्ही जर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी एटीएम/डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा तत्सम काही वापरत असाल, तर अत्यंत जागरुक राहा. कारण तुमचं कार्ड दुसऱ्याकडे स्वाईप करण्यासाठी दिलात आणि त्याने जर एखादी शून्य वाढवली तर तुम्हाला भल्या मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल.
असाच काहीसा प्रकार बंगळुरूत घडला आहे. टोल नाक्यावर 40 रुपये भरण्यासाठी एका डॉक्टरने डेबिट कार्ड दिलं. मात्र टोल कर्मचाऱ्याने 40 रुपयांऐवजी तब्बल 4 लाख रुपये स्वाईप केलं.
कोची-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर उडपीजवळच्या गुंडमी टोल नाक्यावर ही घटना घडली.
काय आहे प्रकरण?
मूळचे म्हैसूरचे असलेले एक डॉक्टर त्यांच्या कारने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. रात्री 10.30 च्या सुमारास त्यांनी या टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी डेबिट कार्ड दिलं. केवळ 40 रुपये भरण्यासाठी डेबिट कार्ड दिल्यानंतर, टोल कर्मचाऱ्याने कार्ड स्वाईप करुन त्याची रिसीट टोल रिसीटसोबत दिली.
त्यानंतर लगेचच डॉक्टरांच्या मोबाईलवर त्यांच्या खात्यातून 4 लाख रुपये डेबिट झालेले अर्थात कपात झाल्याचा मेसेज आला. हा मेसेजे पाहून त्यांना धक्काच बसला.
त्याबाबत त्यांनी टोल कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र टोल कर्मचाऱ्यांनी त्यांची चूक मान्य केली नाही. सुमारे दोन तास हुज्जत घालूनही कर्मचारी आपल्या मतावर ठाम राहिले.
त्यानंतर वैतागलेल्या डॉक्टरांनी टोलनाक्यापासून 5 किमी अंतरावरील कोटा पोलिसात धाव घेतली. त्यावेळी रात्रीचा 1 वाजला होता. मग एका पोलिस कॉन्स्टेबलसोबत ते टोल बूथवर पुन्हा आले.
पोलीसांनी आपल्या भाषेत टोल कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यावर, मग मात्र टोल कर्मचारी वठणीवर आले. त्यांनी संबंधित टोल कर्मचाऱ्याने चुकीची रक्कम टाकल्याचं मान्य केलं. तसंच सर्व रक्कम चेकद्वारे परत करण्याचंही मान्य केलं. मात्र डॉक्टरांनी मला ही रक्कम कॅशमध्येच हवी अशी मागणी केली.
यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी टोलवसुली करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मग टोल कंपनीने 3 लाख 99 हजार 960 रुपयांची जमवाजमव करुन, पहाटे 4 च्या सुमारास डॉक्टरांकडे सुपूर्द केले.
मात्र रात्री साडेदहा ते पहाटे 4 पर्यंत डॉक्टरांना ज्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं, तो भयंकर होता.
या टोलनाक्यावर दिवसाला 8 लाख रुपयांचा टोल जमा होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement