एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

DNH Bypoll : भाजप उभारणार सिल्वासात छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा; गुजरात भाजपकडून घोषणा

DNH Bypoll : भाजप सिल्वासात छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार असून गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी याबाबतची घोषणा मराठी समाज मंडळामध्ये केली.

DNH Bypoll : दादरा नगर हवेली (दानह) लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दानह प्रदेशातील मराठी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नवसारीचे खासदार सी. आर. पाटील उपस्थित होते. या बैठकीत बोलताना त्यांनी नागरिकांना आश्वासन देत भाजपाचे उमेदवार महेश गावित यांच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सिल्वासामध्ये मोठ्या आदरानं आणि अभिमानानं प्रस्थापित केला जाईल, अशी घोषणा केली.

सी. आर. पाटील बोलताना म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी काळे झेंडे फडकवणारे कुटुंब तेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चौकाला देताना अडथळे आणणारे लोकही त्याच परिवाराशी संबंधित आहेत. तेच लोक आज सत्तेसाठी 'जय शिवाजी, जय भवानी'च्या खोट्या घोषणा देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून कार्यरत राहणारे तर आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. मी सर्वांना आश्वासन देतो की, भाजपाचे उमेदवार महेश गावित यांच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सिल्वासामध्ये मोठ्या आदरानं आणि अभिमानानं प्रस्थापित केला जाईल" या शब्दांत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नवसारीचे खासदार सी. आर. पाटील यांनी सिल्वासा येथे आश्वासन दिले. 

दादरा नगर हवेली (दानह) लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दानह प्रदेशातील मराठी समाजाच्या बैठकीत पाटील बोलत होते. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि दानह व दीव दमणच्या प्रभारी विजया रहाटकर, भाजप उमेदवार महेश गावित, प्रदेशाध्यक्ष दीपेश टंडेल, माजी खासदार नटूभाई पटेल, सिल्वासा नगराध्यक्ष राकेश सिंह चौहान, ज्येष्ठ कार्यकर्ते फत्तेसिंह चौहान, दिग्विजय सिंह परमार, उदय सोनवणे, सुनील महाजन, प्रशांत पाटील, महेश गावित, गोविंद पाटील, आनंद सावरे, सुनील पाटील. गोपाल पाटील, डॉ नितीन राजपूत, डॉ. सी. सी. पाटील, दीपक कदम, शत्रुघ्न पाटील, नंदू शेवाळे, सुदर्शन कांबळे यांच्यासह शेकडो मराठी लोक बैठकीस उपस्थित होते.

सिल्वासा ही मराठी माणसांची कर्मभूमी : महेश गावित

"सिल्वासा ही मराठी माणसांची कर्मभूमी आहे. मराठी माणसांनी कष्टाने, मेहनतीने या प्रदेशात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे या प्रदेशावर येथील स्थानिकांइतकाच मराठी माणसांचाही अधिकार आहे. दानह प्रदेश भयमुक्त करण्यासाठी आणि घराणेशाहीचा पराभव करण्यासाठी आपण मला विजयी करावे," असे आवाहन महेश गावित यांनी केलं.

सी. आर. पाटील म्हणाले की, "सिल्वासा परिसर पूर्वी फक्त दहशत आणि गुंडगिरीसाठी ओळखला जात होता. एका कुटुंबाने हा परिसर आपली जहागिर असल्यासारखा करुन ठेवला होता. भाजप खासदार नटूभाई पटेल यांनी ही प्रतिमा बदलली. भाजपाच्या विजयानंतर सिल्वासामध्ये विकासाची गंगा वाहू लागली. सिल्वासामध्ये सुरु झालेली विकास आणि प्रगतीची घोडदौड कायम राखण्यासाठी आपल्याला मजबूत नेतृत्वाची गरज आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहिताचे अनेक प्रकल्प या ठिकाणी सुरु केले आहेत. यात वैद्यकीय महाविद्यालय, आंतरराष्ट्रीय मैदान, अद्ययावत रुग्णालय आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या या विकासकामांप्रती कृतज्ञता म्हणून आपण सर्वांनी महेश गावित यांना विजयी केले पाहिजे.

डॉ नरेंद्र देवरे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. "छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामकरणाला विरोध करणाऱ्या परिवाराने त्यावेळी मराठी माणसांना मारहाणही केली होती. त्या परिवाराने मराठी माणसांना कधीच सन्मानाची वागणूक दिली नाही. कायम दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. या परिवाराला त्यांची जागा दाखवली पाहिजे," असे मत डॉ. देवरे यांनी व्यक्त केले.

बाळासाहेबांनी काय सांगितले होते आणि... 

"सगळ्यांचे ह्रद्यस्थान असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेर फक्त एकदाच प्रचार सभा घेतली होती. ते 1999 मध्ये सिल्वासा येथे आले होते. त्यांनी डेलकर कुटुंबीयांविरुद्ध रणशिंग फुंकले होते आणि सांगितले होते दादागिरी चालणार नाही. काय त्यांचे विचार होते आणि त्यांचे वारसदार आज कुठे चालले आहेत? कोणाच्या मांडीवर जाऊन बसले आहेत? एका बाजूला दहशतवादाचे डबल इंजिन डोक्यावर बसले आहे. तर दुसरीकडे विकासाचे डबल इंजिन भाजपाने लोकांपुढे ठेवले आहे.", असं राष्ट्रीय सचिव, भाजपा आणि प्रदेश प्रभारी विजया रहाटकर म्हणाल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 PmMahayuti On CM Post : मुख्यमंत्री नक्की कोण होणार? शिरसाट, आठवले आणि उदय सामंतांची लक्षवेधी प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Embed widget