Health Identity Card : आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ; पंतप्रधान म्हणाले, आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल होतील
Health Identity Card : पंतप्रधान म्हणाले की, यामध्ये भारतातील आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची शक्ती आहे.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ केला. यादरम्यान कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी जे अभियान सुरु आहे, ते आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आज एका अशा मिशनची सुरुवात होत आहे, ज्यामध्ये भारतातील आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची शक्ती आहे.
जगात कुठेही भारतासारख्या मोठ्या पायाभूत सुविधा नाही : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मला आनंद होतोय की, आजपासून आयुषमान भारत डिजिटल मिशन संपूर्ण देशभरात सुरु करण्यात आलं आहे. हे मिशन देशातील गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांच्या उपचारांत येणारे अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे." पुढे बोलाताना ते म्हणाले की, "130 कोटी आधार क्रमांक, 118 कोटी मोबाईल सब्स्क्राईबर्स, जवळपास 80 कोटी इंटरनेट युजर्स, जवळपास 43 कोटी जनधन बँक खाती एवढं मोठं कनेक्टेड इंफ्रास्ट्रक्चर जगात कुठेच नाहीये. हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर रेशनपासून प्रशासनापर्यंत, पारदर्शी पद्धतीनं सामान्य भारतीयांपर्यंत पोहोचवत आहे."
कोरोना काळात टेलिमेडिसिनचा अभूतपूर्व विस्तार झालाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "कोरोना काळात टेलिमेडिसिनचाही अभूतपूर्व विस्तार झाला आहे. ई-संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास सव्वा कोटी रिमोट कंसल्टेशन पूर्ण झालं आहे. ही सुविधा दररोज देशातील दूर-दूर राहणाऱ्या हजारो देशवासियांना घरबसल्या शहरांतील मोठ्या रुग्णालयांमधील डॉक्टरांशी कनेक्ट करणार आहे."
प्रत्येक नागरिकांचा हेल्थ रेकॉर्ड डिजिटली सुरक्षित राहणार : पंतप्रधान
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "सर्वांना मोफत अभियानातंर्गत भारतानं आज जवळपास 90 कोटी लसीचे डोस दिले आहेत. त्याचा रेकॉर्डही उपलब्ध आहे. यामध्ये को-वीन अॅपची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आयुष्मान भारत-डिजिटल मिशन, आता संपूर्ण देशातील रुग्णालयातील डिजिटल हेल्थ सोल्यूशंसना एकमेकांशी कनेक्ट करेल. यातंर्गत देशवासियांना आता एक डिजिटल हेल्थ आयडी मिळणार आहे. प्रत्येक नागरिकांचं हेल्थ रेकॉर्ड डिजिटली सुरक्षित असेल.
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके





















