एक्स्प्लोर
डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयामधील घसरण, यामुळे डिझेलने नवा विक्रमी दर गाठला आहे.

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये डिझेलच्या किंमती विक्रमी स्तरावर पोहोचल्या आहेत. डिझेलच्या दरात 14 पैसे तर पेट्रोलच्या दरात 13 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज डिझेल 73 रुपये 84 पैशांनी मिळत असून पेट्रोलसाठी 85 रुपये 45 पैसे मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत डिझेलचा प्रतिलिटर दर 69.46 रुपयांवर पोहोचला असून तो आतापर्यंतचा उच्चांकी स्तर आहे. तर पेट्रोल 78 रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत सेल्स टॅक्स किंवा व्हॅट कमी असल्याने दिल्लीत इंधनाचे दर कमी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयामधील घसरण, यामुळे डिझेलने नवा विक्रमी दर गाठला आहे. सोबत पेट्रोलचे दरही विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. 16 ऑगस्टपासून दरात सातत्याने वाढ डॉलरच्या तुलनेत रुपयात सर्वाधिक घसरण झाल्यानंतर 16 ऑगस्टपासूनच डिझेल-पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. मागील दहा दिवसात मुंबईत डिझेलच्या किमतीत 49 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल प्रतिलिटर 57 पैशांनी महागलं आहे. वाढलेल्या किंमतीसाठी कोण किती जबाबदार? सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर 19.48 रुपये तर डिझेलवर 15.33 रुपये प्रति लिटर दराने एक्साईज ड्यूटी वसूल करते. यावर राज्य सरकार विविध दराने व्हॅट वसूल करतं. अंदमान आणि निकोबार पेट्रोल-डिझेलवर सर्वात कमी 6% दराने सेल्स टॅक्स वसूल करतं, तर मुंबई और तेलंगणा सरकार डिझेलवर सर्वाधिक 26-26 टक्के व्हॅट वसूल करतं. दिल्ली सरकार पेट्रोलवर 27% तर डिझेलवर 17.24% व्हॅट वसूल करतं. गेल्या दहा दिवसातील पेट्रोलचे रेट तारीख दर 26 ऑगस्ट 85.20 रुपये 25 ऑगस्ट 85.09 रुपये 24 ऑगस्ट 85.09 रुपये 23 ऑगस्ट 85.00 रुपये 22 ऑगस्ट 85.00 रुपये 21 ऑगस्ट 85.00 रुपये 20 ऑगस्ट 84.91 रुपये 19 ऑगस्ट 84.82 रुपये 18 ऑगस्ट 84.71 रुपये 17 ऑगस्ट 84.63 रुपये गेल्या दहा दिवसातील डिझेलचे रेट तारीख दर 26 ऑगस्ट 73.59 रुपये 25 ऑगस्ट 73.44 रुपये 24 ऑगस्ट 73.44 रुपये 23 ऑगस्ट 73.36 रुपये 22 ऑगस्ट 73.36 रुपये 21 ऑगस्ट 73.36 रुपये 20 ऑगस्ट 73.30 रुपये 19 ऑगस्ट 73.17 रुपये 18 ऑगस्ट 73.10 रुपये 17 ऑगस्ट 73.10 रुपये
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक























