Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
Shaligram Garg Arrested: पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शाळिग्राम गर्ग याला पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोडा गावात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये शाळिग्राम गर्ग आणि अंकित मिश्रा या दोघांचा समावेश आहे. यापैकी शाळिग्राम गर्ग हा बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयरच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरु
अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत चार आरोपींचा समावेश होता. त्यापैकी तीन आरोपांची ओळख पटली असून एका अनोळखी आरोपीचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
प्राथमिक चौकशीनुसार जमिनीसंदर्भातील वादातून गोळीबाराची घटना घडली. गोळीबाराच्या घटनेत एक युवक जखमी झाला होता. त्या युवकावर जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्याची गंभीर स्थिती पाहता ग्वाल्हेरच्या रुग्णालायत पाठवण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करताना गोळीबारात वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
शाळिग्राम गर्गशी कोणताही संबध नाही :पंडित धीरेंद्र शास्त्री
गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की शाळिग्राम गर्ग सोबत त्यांचा काही संबंध नाही. ते पुढे म्हणाले कुटुंबाशीकाही संबंध नाही, संपूर्ण कुटुंब माझा परिवार आहे. कायद्यानुसार कठोर शिक्षा आरोपींना दिली जावी. या प्रकरणाशी संबंध जोडू नये असं पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















