एक्स्प्लोर

Dhanteras 2021 : आरोग्यम् धनसंपदा... धनत्रयोदशीची प्रथा, पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त!

Dhanteras 2021 : आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे, धनतेरस किंवा धनत्रयोदशी. आजच्या दिवशी आपल्याकडे असलेल्या संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते.

Dhanteras 2021 : धनत्रयोदशीची प्रथा, पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त.... जाणून घ्या महत्त्व?

Dhanteras 2021 : धनत्रयोदशीची प्रथा, पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त.... जाणून घ्या एका क्लिकवर

Dhanteras 2021 Date Shubh Muhurat : देशात सध्या कोरोनाची लाट ओसरत असली तरी कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून यंदा पूर्वीच्याच उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. सोमवारी बसुबारस साजरी केल्यानंतर आज मोठ्या उत्साहात धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. पण तुम्हाला धनोत्रयोदशीचं महत्त्व माहीत आहे का? आज आपण धनत्रयोदशी का साजरी करतात आणि त्याचं महत्त्व याबद्दल थोडंस जाणून घेऊया.

दिवाळीत दिव्यांची आरास लावून, आकर्षक रोषणाई करत, फराळ या गोष्टींसह उत्साह आनंद साजरा केला जातो. दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण या एकामागोमाग असतात. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हिंदू दिनदर्शिकेनुसार धनत्रयोदशीचा (Dhanteras)सण कार्तिक महिन्यातील (Kartik Month)कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि धन कुबेर यांच्यासह देवी लक्ष्मीची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे, धनतेरस किंवा धनत्रयोदशी. आजच्या दिवशी आपल्याकडे असलेल्या संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते. असे म्हटले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि धन कुबेर यांची पूजा केल्याने घरात संपत्तीचे भांडार कधीच रिकामे होत नाही. धनत्रयोदशी हा सण संपत्ती आणि समृद्धीचा प्रतीक आहे. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं.

कार्तिक महिन्यातील कृष्णपक्ष (पूर्णिमंत)च्या त्रयोदशीच्या दिवशी अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी समुद्र मंथनाच्या निमित्ताने प्रकट झाले, म्हणून ही तारीख धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखली जाते. भगवान धन्वंतरी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या निमित्ताने भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे, ही भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला प्रत्येकजण भांडी खरेदी करतात.

धनत्रयोदशीची तारीख आणि शुभ वेळ

धनत्रयोदशी या वर्षी 2 नोव्हेंबर 2021 रोजी मंगळवारी आहे. या दिवशी प्रदोष काळ संध्याकाळी 5:37 ते रात्री 8:11 पर्यंत असतो. दुसरीकडे, वृषभ काळ संध्याकाळी 6.18 ते 8.14 पर्यंत राहील. अशा परिस्थितीत धनत्रयोदशीच्या पूजेची शुभ वेळ संध्याकाळी 6.18 ते रात्री 8.11 पर्यंत असेल.  

धनत्रयोदशी पूजा

धनत्रयोदशीच्या दिवशी, संध्याकाळी पूजेच्या वेळी, घराच्या उत्तर बाजूला धन्वंतरी आणि कुबेर यांच्या मूर्तींची स्थापना करा. त्यांच्यासमोर प्रत्येकी एक दिवा लावा. तुपाचा दिवा लावणे चांगले. आता उदबत्ती लावून त्यांची आरती करा आणि भगवान धन्वंतरीला पिवळी मिठाई आणि कुबेरांना पांढरी मिठाई अर्पण करा. पूजेदरम्यान "ओम ह्रीम कुबेराय नम:"चा जप करा. यानंतर "धन्वंतरी स्तोत्र" पठण करा. सरतेशेवटी आरती करा आता चूक झाल्याबद्दल माफी मागून हात जोडून नमस्कार करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget