एक्स्प्लोर
दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयातील अनोखी लव्ह स्टोरी
अशाप्रकारचा एक प्रयत्न 1991 मध्येही करण्यात आला होता.
नवी दिल्ली : दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात सोमवारी 27 वर्षांनंतर शाही बंगाल वाघ आणि पांढरी वाघीण यांचं मिलन झालं. चांगल्या प्रजातीच्या अपत्यासाठी तीन वर्षांची वाघीण निर्भया आणि पाच वर्षांचा वाघ करण यांना प्राणीसंग्रहालय प्रशासनाने दोघांना काही काळ एकमेकांसोबत ठेवलं होतं. रविवारी दोघांचं मिलन संपन्न झालं.
"आम्ही काही काळापूर्वीच याची योजना बनवली होती. मे ते जून हा वाघांच्या प्रजननाचा उत्तम काळ असतो. त्यानुसार या जोडप्याला काही काळापर्यंत एकमेकांसोबत ठेवलं. दोन दिवसात 15 वेळा त्यांचं मिलन झालं आणि रविवारी निर्भया आणि करणला एकाच पिंजऱ्यात एकत्र ठेवलं. या जोडप्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत बछड्यांचा जन्म होण्याची शक्यता आहे. सामान्यत: वाघिणीच्या गर्भावस्थेचा कालावधी 110 दिवसांचा म्हणजेच साडेतीन महिन्याचा असतो," अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालिका रेणू सिंह यांनी दिली.
"पर्यटकांना या दोघांना पाहता यावं, यासाठी सोमवारी त्यांना खुलं ठेवण्यात आलं. पण त्यांना जास्त काळ एकत्र ठेवणार नाही. मिलन झाल्यानंतर काही काळाने त्यांना पुन्हा आपापल्या जागी सोडलं जाईल," असं प्राणी संग्रहालय प्रशासनाने सांगितलं.
अशाप्रकारचा एक प्रयत्न 1991 मध्येही करण्यात आला होता. शाही बंगाल वाघ सुंदर आणि पांढरी वाघीण शांतीच्या मिलनातून एका पांढऱ्या (स्वराज) आणि एका बंगाल वाघाचा (अमन) जन्म झाला होता.
पांढऱ्या वाघांचं परस्परांमध्ये प्रजनन जास्त होतं. पण पांढरी वाघीण आणि बंगाल वाघाच्या मिलनामुळे, शाही बंगाल वाघाचा डॉमिनन्ट जीन या प्रजातीच्या जीनपूलमध्ये सामील होईलच, पण त्यातून जन्माला येणारे बछडेये पांढऱ्या किंवा करड्या रंगाचे असू शकतात.
या योजनेचा मूळ उद्देश पांढऱ्या वाघाच्या प्रजातीमध्ये परस्पर प्रजननाला प्रोत्साहन देणं आणि होणाऱ्या अपत्यांचं जीनपूल उत्तम करणं हा आहे. महत्त्वाचं म्हणजे पांढरी वाघीण निर्भया ही संग्रहालयाचं प्रसिद्ध जोडपं विजय आणि कल्पनाची बछडी आहे.
दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात सध्या एकूण सहा पांढरे वाघ आहेत, त्यात पाच मादी आणि दोन नर आहेत. तर पाच शाही बंगाल वाघ आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement