Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात, घटनेच्या दोन तासाच्या आत पोलिसांची कारवाई
Delhi Red Fort Bomb Blast : हरियाणातील फरिदाबादमध्ये कारवाई करत दिल्ली पोलिसांनी सात दहशतवाद्यांना अटक केली होती. त्याचा दिल्ली स्फोटामागे काही हात आहे का याचा तपास केला जात आहे.

Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. स्फोट झाल्यानंतर दोन तासांच्या आत या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. या स्फोटामागे घातपात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. दिल्ली स्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी आहेत.
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ सोमवारी सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी एक स्फोट झाला. त्यानंतर त्या ठिकाणी पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांना आग लागली. सकाळीच हरियाणातील फरिदाबादमध्ये सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्याचा या स्फोटाशी काही संबंध आहे का याचा तपास करण्यात येत आहे.
Delhi Blast Suspect Arrest : एक संशयित ताब्यात
दिल्ली स्फोटानंतर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सर्वत्र झाडाझडती सुरू आहे. त्याचवेळी स्फोट घडल्यानंतर दोन तासांच्या आत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे या तपासाला आता गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्ली स्फोटानंतर यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Delhi Red Fort Bomb Blast : 11 जणांचा मृत्यू
राजधानी दिल्लीमध्ये संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास एका कारमध्ये भीषण स्फोट घटला. लाल किल्ला मेट्रो स्टेशन सिग्नलजवळ हा स्फोट झाला. यावेळी दोनदा मोठ्या स्फोटाचा आवाज झाल्याची माहिती आहे. या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि या त्यात काही गाड्या जळून खाक झाल्या.
या घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण जखमी असल्याची माहिती मिळते. अद्याप या स्फोटाचा कारण समजलं नसून या प्रकरणातील सर्व शक्यतांची चाचपणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिली. या स्फोटात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याठिकाणी अमित शाहांनी भेट दिली.
Delhi Blast Update : स्फोटासाठी वापरलेली गाडी हरियाणातील
दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटासाठी वापरलेली गाडी ही हरियाणाची असल्याची माहिती आहे. या स्फोटात वापरलेल्या आय-ट्वेन्टी गाडीवर गुरुग्रामचा नंबर होता अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिली. या प्रकरणात सर्व शक्यतांची चाचपणी केली जात असून परिसरातील सीसीटीव्हींचा तपासही सुरू करण्यात आला आहे.
Faridabad Terrorist Arrest : फरिदाबादमध्ये सात दहशतवाद्यांना अटक
दिल्लीतील स्फोटामुळे आज सकाळीच फरीदाबादमध्ये झालेल्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी सकाळी फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. तसंच 350 किलो स्फोटकही जप्त करण्यात आले आहेत. फरीदाबाद मेडिकल कॉलेज दिल्लीतील स्फोटाच्या स्थळापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे.
ही बातमी वाचा:
























