एक्स्प्लोर
सुरक्षा भेदून संसदेत घुसण्याचा प्रयत्न, चाकूसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सूत्रांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेला आरोपी हा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमचा समर्थक आहे. पोलिस त्याला संसद भवन स्टेशनला घेऊन गेले असून त्याची चौकशी सुरु आहे.
नवी दिल्ली : संसद भवनाच्या सुरक्षा कवच भेदण्याचा प्रकार समोर आला आहे. संसद परिसरात चाकू घेऊन घुसणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेट क्रमांक 1 मधून तो संसद परिसरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेला आरोपी हा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमचा समर्थक आहे. पोलिस त्याला संसद भवन स्टेशनला घेऊन गेले असून त्याची चौकशी सुरु आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव इन्सा आहे, जो दिल्लीच्या लक्ष्मीनगर परिसरात राहतो. आरोपी राम रहीमच्या समर्थनार्थ घोषणा देत होता. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आरोपी स्प्लेंडर बाईकवरुन संसद भवनापर्यंत पोहोचला होता. त्याची बाईकही जप्त केली आहे. मात्र संसद परिसरात घुसण्याचा त्याचा नेमका उद्देश काय होता, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.Delhi: A person has been detained while he was trying to enter the Parliament allegedly with a knife. He has been taken to Parliament police station. pic.twitter.com/rKforH5i5R
— ANI (@ANI) September 2, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement