एक्स्प्लोर
Advertisement
दिल्लीत मराठी कुटुंबात दुहेरी हत्या, वृद्ध बहिणींचे मृतदेह आढळले
पाठक कुटुंबाकडे प्लंबिंगच्या कामासाठी आलेल्या व्यक्तीने दोघींचा जीव घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत राहणाऱ्या मराठी कुटुंबात दुहेरी हत्याकांडं घडलं आहे. आशा पाठक आणि उषा पाठक या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह राहत्या घरी आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातल्या आनंदवन सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली आहे. पाठक कुटुंबाकडे प्लंबिंगच्या कामासाठी आलेल्या व्यक्तीने दोघींचा जीव घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. धारदार शस्त्राने वार करुन दोघींचा गळा आवळल्याची प्राथमिक माहिती आहे.
आशा आणि उषा पाठक या दोघीही बहिणी अविवाहित होत्या. त्यांचं वय अंदाजे 70 ते 72 वर्षांच्या आसपास होतं. आनंदवन सोसायटीतील फ्लॅटमध्ये त्या दोघीच राहत होत्या. मयतांपैकी एक बहीण निवृत्त शिक्षिका होती, तर दुसरी ग्रंथपाल म्हणून कार्यरत होती.
आरोपी दोघींच्या ओळखीतील असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे, कारण घरात बळजबरीने घुसखोरी केल्याच्या खुणा आढळलेल्या नाहीत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांनी घरातल्या काही कामासाठी प्लंबर बोलावला होता. त्यामुळे प्लंबरनेच दोघी वृद्ध बहिणींची हत्या केल्याचा कयास पोलिसांनी वर्तवला आहे. सोसायटीतलं सीसीटीव्ही फूटेज पाहून पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement