दिल्ली हिंसाचारावर केंद्रीय गृह मंत्रालयाची मोठी कारवाई, या पाच आरोपींविरुद्ध लावला 'एनएसए'
Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी गृह मंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे.
Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी गृह मंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली हिंसाचारातील पाच आरोपींविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लावण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात इतर आरोपींवरही अशीच कठोर कारवाई होऊ शकते. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
ज्या पाच आरोपींविरुद्ध एनएसए लागू करण्यात आला आहे, त्यात मुख्य आरोपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन्सारच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय आरोपी सलीम, इमाम शेख उर्फ सोनू, दिलशाद आणि अहिर यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
कडक कारवाई करण्याच्या सूचना
तत्पूर्वी जहांगीरपुरी हिंसाचारानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांना फोन करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यावेळी अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना आरोपींविरुद्ध एवढी कठोर कारवाई करण्यास सांगितले की, कोणीही पुन्हा हिंसाचार किंवा दंगलीचा विचार करणार नाही. याशिवाय या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. आता याच्याच एका दिवसानंतर आरोपींविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लावण्याचे प्रकरण समोर आले आहे.
दरम्यान, दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही आणि चौकशीनंतर लोकांची ओळख पटवण्यात पोलीस व्यस्त आहेत. भविष्यात या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 'एवढी कठोर कारवाई करा की, पुन्हा हिंसा घडता कामा नये', जहांगीरपुरी हिंसाचारावर अमित शाह यांचे पोलिसांना कडक निर्देश
- Delhi Violence : दिल्लीतील दगडफेकीनंतर राजकारण; केजरीवालांचं सुरक्षेवरून केंद्राकडे बोट, भाजपचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
- Delhi Violence : जहांगीरपुरी दगडफेक प्रकरणात 21 जणांना अटक, दोन आरोपी अल्पवयीन, पिस्तूलांसह तलवारी जप्त; जाणून घ्या प्रकरण
- काल दिल्लीत हिंसाचार, आज हिंदू संघटनांनी काढली रथयात्रा; लहानग्यांच्या हातातही नंग्या तलवारी
- Hanuman Jayanti: दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीत गोंधळ, दगडफेक आणि तोडफोड; अनेक पोलिसही जखमी