(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dengue Alert : डासांपासून दिल्ली सरकार सतर्क! शाळांमध्ये प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना, मुलांसाठी 'हे' नियम आवश्यक
Delhi Government Dengue Alert : दरवर्षी दिल्लीत डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाची अनेक प्रकरणे आढळतात. अशा परिस्थितीत यावेळी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
Delhi Government Dengue Alert : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत (Delhi Flood) मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे दिल्लीत पूर आणि डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी दिल्ली सरकार आता सतर्क झालं आहे. याच संदर्भात आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज (Saurabh Bhardwaj) यांनी मंगळवारी (18 जुलै) रोजी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या या बैठकीत आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी पावसामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्याबाबत कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शाळांमध्ये डास प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यास आणि डेंग्यू प्रतिबंधासाठी शाळकरी मुलांची मदत घेण्यास देखील सांगितले आहे.
'या' अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीत आरोग्य विभाग, एमसीडी, एनडीएमसी, दिल्ली जल बोर्ड, पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभाग, शिक्षण इत्यादी विभागाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात विशेषत: लहान मुलांना डेंग्यू आणि तापाचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी शिक्षण संचालनालय आणि एमसीडीच्या सर्व शाळांना शिस्त वाढविण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे नियम अधिक कडक शिस्तीचे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांची दिल्ली सरकारला मदत
पावसात वाढणाऱ्या डेंग्यु आजाराचा सामना करण्यासाठी तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्यास सांगितले आहे जेणेकरून डास चावणार नाहीत. डेंग्यूचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकार सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचीही मदत घेणार आहे. शालेय मुले डेंग्यूच्या बाबतीत आपल्या गृहपाठाद्वारे जनजागृती करण्यास सांगितले आहे. तसेच, घरात कुठेही साचलेले पाणी वाढू न देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
आरोग्यमंत्री म्हणाले...
आरोग्यमंत्री सौरभ भारद्वज यांनी जारी केलेल्या निर्देशात असे म्हटले आहे की, जर विद्यार्थ्यांकडे पूर्ण बाह्यांचा शालेय गणवेश नसेल तर त्यांना पूर्ण बाह्यांचा शर्ट, पॅंटसह कोणतेही कपडे घालण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याशिवाय, एमसीडी आणि दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाला निर्देश देण्यात आले होते की, शालेय विद्यार्थ्यांना डेंग्यू होमवर्कच्या नावावर एक कार्ड दिले जाईल. या कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जनजागृती करायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या :