एक्स्प्लोर
Advertisement
Delhi Election : भाजप निवड समितीची बैठक पूर्ण; आज उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता
विधानसभेच्या 70 जागांसाठी दिल्लीत आठ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर, 11 फेब्रुवारीला याचा निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवड समितीची बैठक पार पडली असून आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीला केंद्रस्थानी ठेऊन भाजपने स्थापीत केलेल्या केंद्रीय निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या बैठकीत सहभागी झाले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचीही यावेळी उपस्थिती होती. भाजपच्या उमेदवारांची पहली यादी आज येण्याची शक्यता आहे.
राज्य निवड समितीने प्रत्येक जागेसाठी दोन दोन नावे पाठवली आहेत. या बैठकीत निवडणुकीच्या प्रचाराची रणनितीवरही चर्चा केल्याची माहिती आहे. भाजप दिल्लीमध्ये छोट्या मोठ्या मिळून तब्बल 5000 बैठका घेणार आहे.
विधानसभेच्या 70 जागांसाठी आठ फेब्रुवारीला मतदान -
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होणार असून 11 फेब्रुवारीला याचा निकाल घोषित करण्यात येणार आहे. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने आपल्या सर्वच 70 उमेदवारांची एकाचवेळी नावे घोषित केली आहे. आता काँग्रेस आणि भाजप आपले उमेदवार कधी घोषित करतात यावर सर्वांच्या नजरा आहे. मागील वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष दोन नंबरवर होता. मात्र, त्यांना केवळ तीनच जागा मिळाल्या होत्या. 70 पैकी 67 जागांवर आपचे उमेदवार निवडून आले होते.
70 जागांसाठी 13750 मतदान केंद्र -
70 जागांसाठी राज्यभरात 13750 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. तर 2689 जागी मतदान होणार आहे. यासाठी 90 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ व्यक्तीसाठी पोस्टाद्वारे मतदान करण्याची सोय करण्यात आलीय. त्यासाठी पाच दिवस अगोदर अर्ज करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखेसह दिल्लीत आचारसंहिता लागू केली आहे. परिणामी सरकार कोणत्याच योजनेची घोषणा करू शकणार नाही.
22 फेब्रुवारी विधानसभा होणार बरखास्त -
विद्यमान विधानसभा कार्यलय मुदत संपत असल्याने 22 फेब्रुवारीला बरखास्त होणार आहे. 14 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यासर सुरुवात झाली असून 21 जानेवारी हा अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. 22 जानेवारीला अर्ज छाननी होणार असून 24 जानेवारीला अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. विधानसभेच्या 70 जागांपैकी 12 जागा या आरक्षित आहे, तर 58 जागा खुल्या वर्गातील आहे.
संबंधित बातमी - राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांची दिल्लीत भेट
Delhi Fire | खूपच दु:खद घटना, मदत आणि बचावकार्य सुरु : अरविंद केजरीवाल | ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement