एक्स्प्लोर
मोदींचा सर्जिकल स्ट्राईक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा : नरेंद्र जाधव
नवी दिल्ली: "मोदी सरकारने काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. रिअल इस्टेटला त्याचा सर्वात मोठा फटका बसेल. काही काळ गैरसोय होईल, पण अर्थव्यवस्थेसाठी हा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. मात्र पैशांच्या रुपांतरात बँकांकडून, विशेषत: को ऑपरेटिव्ह बँकांकडून भ्रष्टाचाराची शक्यता आहे", असं अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभा खासदार नरेंद्र जाधव यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
"थैलीशहांचे पैसे अॅडजेस्ट करण्यासाठी भ्रष्ट अधिकारी नियमांत फेरफार करण्याची शक्यता आहे. त्यावर करडी नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. मोदी सरकारचा हा काळ्या पैशांवरचा 'सर्जिकल स्ट्राईक' आहे. रिअल इस्टेटला त्याचा मोठा फटका बसेल" असं जाधव म्हणाले.
टॅक्स कलेक्शन वाढेल
मोदींच्या या निर्णयामुळे सरकारचं कर वसुल अर्थात 'टॅक्स कलेक्शन' प्रभावीपणे वाढेल. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठीही सोयीचं ठरेल. ज्या राज्यांना नुकसान भरपाई द्यायची आहे, त्यांना १०० टक्के भरपाई देणं सोपं होईल, असंही नरेंद्र जाधव यांनी नमूद केलं.
आधीच जनधनच्या माध्यमातून गरिबांचे अकांऊट काढलेले आहेत. त्यामुळे बँकांमध्ये अधिक पैसा जमा झाल्याने बँकिंग यंत्रणा सक्षम होतील, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या
नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार
500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्दअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement