एक्स्प्लोर

AAP in Gujarat: पंजाबनंतर 'आप' चे लक्ष गुजरातवर, अरविंद केजरीवाल आज गुजरात दौऱ्यावर, तिरंगा यात्रेत होणार सहभागी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली, पंजाबपाठोपाठ गुजरात राज्यातही आप ची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे.

Arvind Kejriwal in Gujarat : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने सत्ता काबिज केल्यानंतर आता आपला मोर्चा अन्य राज्यांकडे वळवला आहे. दुसऱ्या राज्यात पक्षाचे स्थान बळकट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली, पंजाबपाठोपाठ गुजरात राज्यातही आप ची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. यावर्षी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. 

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला विजय मिळाल्यानंतर त्यांचे मनोबल वाढले आहे. अन्य राज्यात पक्षाची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. गुजरातमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी आप ने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये आपला झेंडा फडकवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आता तिरंगा यात्रेच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचे काम करण्यावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत आज दुपारी साजेतीन वाजण्याच्या सुमारास दिल्ली विमानतळावरुन केजरीवाल गुजरातमधील अहमदाबादकडे रवाना होणार आहेत.  

तिरंगा यात्रेत सहभागी होणार

गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास ते आम आदमी पक्षाच्या तिरंगा यात्रेत सामील होतील. ही तिरंगा यात्रा मेहसाणाच्या जुन्या बसस्थानकापासून सुरु होईल. त्यानंतर केजरीवाल रात्री अहमदाबादहून दिल्लीला रवाना होतील.

आप गुजरातमधील सर्व जागा लढवणार 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष गुजरातमधील विधानसभेच्या सर्व 182 जागा लढवणार आहे. सर्व जागा लढवणार आहे, त्यामुळे निवडणुकीच्या वेळी लोकांना पर्याय असेल असे सिसोदिया म्हणाले. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच आपले उमेदवार उभे केले होते. तेव्हा पक्षाचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नव्हता. फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या सुरतच्या नगरपालिका निवडणुकानंतर आप'च्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुरत महापालिका निवडणुकीत आप ला 27 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने 93 जागा जिंकल्या होत्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget