Delhi Bomb Blast News: ठिकाण वेगळं आखलेलं, चुकून लाल किल्ल्याजवळ ट्रिगर दाबलं; दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला स्फोटात सहभागी असलेल्या फरिदाबाद-सहारापूर जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलचे पुरावे गुप्तचर संस्थांना मिळाले आहेत.

Delhi Bomb Blast News: देशाची राजधानी दिल्ली काल (10 नोव्हेंबर) स्फोटाने (Delhi Bomb Blast) हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला (Delhi Red Fort Blast) मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी 6.52 वाजता भयंकर स्फोट झाला. दरम्यान, सदर प्रकरणी एएनआयकडून कसून तपास सुरु आहे. या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला. ताब्यात घेतलेला डॉ. उमर हा जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने जैश ए मोहम्मदला मोठा दणका दिला होता.
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटात (Delhi Bomb Blast) सहभागी असलेल्या फरिदाबाद-सहारापूर जैश-ए-मोहम्मद (jaish e mohammed) मॉड्यूलचे पुरावे गुप्तचर संस्थांना मिळाले आहेत. वरिष्ठ गुप्तचर सूत्रांनुसार, हरियाणा नोंदणी क्रमांक असलेली कार उमर मोहम्मदची होती, जो फरिदाबाद-सहारापूर जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंधित होता. कालच्या छाप्यानंतर, हे व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी स्फोट घडवण्याचा विचार करत होते, परंतु लाल किल्ल्याजवळ चुकून स्फोटचं ट्रिगर दाबल्याने तिकडे स्फोट झाला. गुप्तचर अधिकाऱ्यांनी उमर मोहम्मदच्या काही सहकाऱ्यांची ओळख पटवली आहे आणि इतरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आतापर्यंत 9 जण ठार व 24 जण जखमी- (Delhi Red Fort Blast)
दिल्लीतील या स्फोटात आतापर्यंत 9 जण ठार व 24 जण जखमी झाले. या स्फोटात अनेकांचे हात-पाय, शरीराच्या विविध भागांचे अवयव उडाल्याचे देखील समोर आले. स्फोटानंतर आग भडकली व परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला. मेट्रो स्टेशनच्या गेट आणि आजूबाजूच्या काचाही फुटल्या. जवळपास 32 गाड्यांच्या चिंधड्या उडाल्या.
दिल्ली स्फोट अन् फरीदाबादमधील कनेक्शन काय? (Delhi Bomb Blast)
दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत झालेला स्फोट अधिक तीव्रतेचा होता. फरीदाबादमधील कारवाईनंतर दिल्लीत स्फोट घडवल्याची तपास यंत्रणांना शंका आहे. त्यामुळे फरीदाबादमधून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. तसंच 350 किलो स्फोटकंही जप्त करण्यात आलीत. यूपीचे डॉक्टर आदिलसह हरियाणाचे डॉक्टर मुजम्मिल यांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं? (Delhi Red Fort Blast)
1. दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशननजीकच्या सिग्नलजवळ कारमध्ये स्फोट
2. सोमवार 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.52 दरम्यान घटना घडली
3. स्फोट इतका भीषण की, साधारण 8 ते 10 कार आणि इतर वाहने जळून खाक
4. सायंकाळी 6.55 वाजता अग्निशमन दलाला स्फोटाची माहिती मिळाली
5. दिल्ली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल, नपासाला सुरुवात
6. लाल किल्ल्याभोवतीचा संपूर्ण परिसर, चांदणी चौक आणि रस्ते बंद
7. कारचा स्फोट कशामुळे झाला याबाबतचे अधिकृत कारण अद्याप अस्पष्ट
8. घटनेनंतर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती
9. रात्री 10 पर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, देशभरात हायअलर्ट जारी
























