एक्स्प्लोर

‘तुझ्यावर बलात्कार व्हायला हवा’, मिनीस्कर्ट घातलेल्या तरुणीला उद्देशून महिलेचं वक्तव्य

कुणी कसे कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे, पण त्याच कपड्यांवरुन दिल्लीत महाभारत घडलं. दिल्लीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये काही तरुणी मिनी स्कर्ट घालून बसल्या होत्या, तिथे आलेल्या एका काकूंना त्यांचा ड्रेस खटकला आणि त्यांनी शेरेबाजी सुरु केली.

नवी दिल्ली: देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक वर्षांपासून चालत आला आहे, त्यातच आता सुरक्षेच्या नावावर त्यांचं स्वातंत्र्य देखील काढून घेतलं जात आहे. कुणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भारतात महिलांना कपडे घालण्यावरून कोणतेही बंधन नाही. एकीकडे महिला सक्षमीकरण करण्यावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे एक महिलाच समाजासमोर आपली दूषित मानसिकता मांडते. असाच एक प्रकार दिल्लीमध्ये घडला. "या मुलींना लहान कपडे घालून अंगप्रदर्शन करत सर्वाना आकर्षित करायचे आहे, ज्या महिला असे लहान कपडे घालतात त्यांच्यावर बलात्कार होतो" असे शब्द एका काकूंने दिल्लीतील मुलींना उद्देशून वापरले. सध्या एका वायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हा प्रकार दिसून आला. झालं असं की या काकूंना एका मुलीचा शॉर्ट ड्रेस खटकला, इतके लहान कपडे घालणाऱ्या मुलींवर बलात्कार व्हायला हवा असं या बाईने म्हटलं. हा प्रकार एका हॉटेलमध्ये घडला, पण त्याचा काही पुरावा नसल्यामुळे मुलींच्या समूहाने काकूंना पुन्हा मॉलमध्ये गाठले. व्हिडीओ शूट करुन काकूंना या प्रकाराबद्दल माफी मागायला या मुलींनी सांगितलं. मिनी स्कर्ट घातलेल्या तरुणीवर बलात्काराचा महिलेचा सल्ला? माफी न मागितल्यास आम्ही हा व्हिडीओ वायरल करु असं सांगितल्यावर देखील या महिलेने माफी मागितली नाही, तर व्हिडीओ नक्की वायरल करा असं काकू म्हणाल्या. प्रकरण इथेच थांबलं नाही, हा प्रकार घडत असताना मुलींची बाजू घेऊन मॉलमध्ये आलेल्या एका महिलेनेदेखील काकूंना समजवण्याचा प्रयत्न केला पण तोही व्यर्थ ठरला कारण मुलींचं समर्थन करत असल्यामुळे तुमच्यावर देखील बलात्कार होईल असं या काकूंने म्हटलं. ज्या मुलीला या काकूंने शेरेबाजी केली त्या मुलीने दहा मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि काकू एका रात्रीत वायरल झाल्या. नुकत्याच जन्माला आलेल्या मुलींवर बलात्कार होतो, साडी नेसणाऱ्या आजींवर बलात्कार होतो याला काय कारण, असं विचारल्यानंतर, बलात्कार करणारे पुरुषच विकृत असल्याचं काकू म्हणाल्या. संपूर्ण भारताने हा व्हिडीओ पाहायला हवा असं ही बाई म्हणाली. हा व्हिडीओ तब्बल 10 लाखांपेक्षाही जास्त लोकांनी पाहिला. इन्स्टाग्रामने मात्र काही वेळात हा व्हिडीओ डिलीट केला. तुम्ही मॉलमध्ये जा किंवा रस्त्यावरील बाजारात, मराठीत बोला किंवा इंग्रजीत, जर तुमचे विचारच दूषित असतील तर तुमचं शिक्षण किंवा भाषा तुम्हाला खरं ठरवत नाही याचं हे उत्तम उदाहरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget