एक्स्प्लोर

दिल्लीतील हॉटेलमधल्या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये बाळाचाही समावेश

हॉटेलमधील भीषण आगीमुळे तिथे एकच गोंधळ झाला. काही जणांनी इमारतीमधून उडी मारल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नवी दिल्ली : दिल्लीतील करोल बागमधील चार मजली हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये आज पहाटे लागलेल्या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, ज्यात बाळ आणि महिलांचाही समावेश आहे. मृतांमध्ये दिल्लीत आलेल्या पर्यटक आणि इतरांचा समावेश आहे. याशिवाय म्यानमार आणि कोच्चीमधूनही आलेल्या लोकांचा आगीत मृत्यू झाला. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या दिल्लीतील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अग्निशमन दलाने हॉटेलमधून 30 पेक्षा जास्त जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. सोबतच आगीवर नियंत्रण मिळवून बचावकार्य पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं. मृतांमध्ये बहुतांश जण एकाच कुटुंबातील असून ते केरळच्या कोच्चीचे रहिवासी आहेत. एका लग्नासाठी ते दिल्लीत आले होते. मात्र काही मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या दुर्घटनेतील बऱ्याच लोकांचा मृत्यू श्वास गुदमरुन झाला आहे. एसी रुमच्या खिडक्या (काचेच्या खिडक्या) बंद होत्या, ज्यामुळे धूर बिल्डिंगबाहेर जाऊ शकला नाही. गाढ झोपेत असलेल्या हॉटेलचे पाहुणे आगीच्या कचाट्यात सापडले. यावेळी चार ते पाच जणांनी इमारतीवरुन उडी मारली. दोघांनी उशीच्या आधारे उडी मारली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. बचावकार्यादरम्यान बाहेर काढलेले मृतदेह आणि जखमींना राम मनोहर लोहिया रुग्णालय, लेडी हार्डिंग रुग्णालय, गंगा राम आणि जवळच्या नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं आहे. बेसमेंट आणि चार मजले, अशी हॉटेलची इमारत आहे. यामध्ये सुमारे 65 खोल्या असल्याचं समजतं. त्यावर किचन आहे. पहिल्या मजल्यावर आग लागली, जी वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचली. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये 100 पेक्षा जास्त पाहुणे आणि 15-20 कर्मचारी होते, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आग लागल्याचं ज्यांना कळलं, ते तिथून सुरक्षित बचावले. बाकीचे अंधार आणि धुरात अडकले. हॉटेलमध्ये फायर सेफ्टीची योग्य व्यवस्था नव्हती. गेस्ट हाऊस आणि हॉटेलमध्ये आपत्कालीन रस्ता नव्हता. एसीमुळे सगळ्या खिडक्या बंद होत्या. अग्निशमन दलाचे जवान शिडीच्या मदतीने रुमच्या खिडक्या तोडून आत पोहोचले. तिथूनच लोकांना बाहेर काढलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात आहे. पोलिस कारणांचा शोध घेत आहेत. हॉटेल मालकाला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget